एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार दोनशे व्होल्वो बस; लांबचा प्रवास होणार आरामदायी

MSRTC Volvo Buses; एसटी महामंडळाच्या ताफ्यात 200 वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत. यात आसनी आणि शयनयान बसेसचा समावेश असेल.

MSRTC Volvo Buses

MSRTC to Add 200 Premium Volvo Buses for Long-Distance Travel: महाराष्ट्रातील लांब अंतराच्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. खासगी आराम बससेवांकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात 200 वातानुकूलित व्होल्वो बसेस (MSRTC Volvo Buses) दाखल करण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याबाबत माहिती दिली.

दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; वरुण सरदेसाईंचे विरोधकांना थेट आव्हान

या नव्या ताफ्यात 170 आसनी आणि 30 शयनयान बसेसचा समावेश असेल. एसटी महामंडळाच्या ताफ्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत.

250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर दिवसा 45 आसनी आरामदायी बसेस चालवण्याचे नियोजन आहे. तर रात्रीच्या प्रवासासाठी 30 किंवा 45 शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या वेळेनुसार आसनी किंवा शयनयान प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीला अटक; 30 दिवस ताब्यात ठेवणार, नेमकं कारण काय?

दरम्यान, खासगी आराम बससेवांच्या तुलनेत एसटीची सेवा अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल बुकिंग सुविधेलाही प्राधान्य दिले जाणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाइन आरक्षण प्रणालीसोबतच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट बुक करता येणार आहे. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या सीट आरक्षण करण्याची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

दगडूशेठच्या दर्शनासाठी अमित ठाकरेंची हजेरी; राज ठाकरेंबद्दल गणरायाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना

लांब पल्ल्याच्या प्रवासात वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसने आणि रात्रीच्या प्रवासासाठी शयनयान बस उपलब्ध करून देत एसटी महामंडळाने खासगी आराम बससेवेला पर्याय उभा करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी काळात एसटीच्या लांब पल्ल्याच्या सेवेत मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

follow us