दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; वरुण सरदेसाईंचे विरोधकांना थेट आव्हान

Disha Salian Death Case : या प्रकरणावरून दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 20T184437.850

Disha Salian Death Case :  दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील (Disha Salian) नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सीबीआयने या प्रकरणात नव्याने एफआयआर दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्यासह काही नावांचा उल्लेख तपासाशी संबंधित कागदपत्रांत झाल्याचे वृत्त आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने पुरेसे पुरावे मिळेपर्यंत कोणालाही आरोपी मानू नये, असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणावरून दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलो नसल्याचे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीसही बजावली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण; आदित्य ठाकरेंसह रिहा चक्रवर्ती, डिनो मोरियाचं FIR मध्ये नाव

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आरोप करणाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्यांनी एक तरी ठोस पुरावा समोर आणावा, असे त्यांनी म्हटले. पुरावे नसताना आरोप सुरू राहिल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल आणि आता फार काळ शांत बसणार नसल्याचा इशाराही सरदेसाई यांनी दिला.

दरम्यान, 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीमुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. सतीश सालियन हे त्यांच्या वकिलांसह मातोश्रीवर नोटीस देण्यासाठी पोहोचले होते. या नोटिशीत आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत माफी आणि नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. आता या नोटिशीला आदित्य ठाकरे काय उत्तर देतात आणि सीबीआयच्या तपासातून पुढे कोणते पुरावे समोर येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us