दिशा सालियन मृत्यू प्रकरण; आदित्य ठाकरेंसह रिहा चक्रवर्ती, डिनो मोरियाचं FIR मध्ये नाव

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सीबीआयने तब्बल सहा वर्षांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Disha Salian Case

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सीबीआयने तब्बल सहा वर्षांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील नाव समाविष्ट करण्यात आल्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सीबीआयने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह अभिनेत्री रिहा चक्रवर्ती (Rhea Chakraborty) , अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) , सूरज पंचोली यांच्यासह माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझेसह इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयसमोर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियान यांनी नोंदवलेल्या जबावानंतर सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सीबीआयने (CBI) या प्रकरणात कलम 302, 376, 120 ब, 210 पुरावे नष्ट करणे, 217 आणि 218 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत ची मॅनेजर म्हणून दिशा काम पाहत होती. 8 जून 2020 रोजी मालवणी येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केली असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे मात्र आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. या प्रकरणात दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन नव्यानं चौकशी करण्याची आणि सीबीआयद्वारे तपास करण्याची मागणी केली होती.

NCPI ला मोठा धक्का 20 पैकी 17 भाजपात जाणार? ‘या’ दिवशी होणार घोषणा –

तर दुसरीकडे आता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमूख यांच्यासह अभिनेता डिनो मोरिया,सूरज पंचोली, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती यांच्या भूमिकेची सीबीआयकडून सखोल चौकशी होण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष पोलीस उपअधीक्षक पुराण सिंह यांची नियुक्ती केली आहे.

follow us