मानसिक संतुलन बिघडलं, काय पोराटोरांचे ऐकता? उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
Eknath Shinde On Aditya Thackeray : राज्य विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde On Aditya Thackeray : राज्य विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session 2026) दुसऱ्या दिवशी लक्षवेधीच्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांकडून उत्तर मिळत नसल्याने आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
जी खाती रडून घेतली त्या खात्याबाबत उत्तर द्यावं, फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर तसं लिहून द्यावं. आमच्या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी पळ काढला नाही की जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली नाही. जी खाती रडून घेतली त्याबाबत उत्तर द्यायला हवीत असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आणि यानंतर त्यांनी सभात्याग केला. त्यांनी केलेल्या सभात्यागच्या काही वेळेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभागृहात एन्ट्री झाली.
त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे सभागृहात पोहोचताच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांची माहिती घेत आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, कुठे गेले, तुमचे मित्र, कुठे आहेत?, घरी गेले का? मी सभागृहात नव्हतो, मंत्र्यांनी मला सांगितलं. काल जो झटका लागला आहे त्यामुळे त्यांचं (आदित्य ठाकरे) मानसिक संतुलन बिघडलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.
लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू नाही तर हत्या; धक्कादायक कटा’चा उलगडा
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कोण होतासस तू, काय झालास तू, अरे वेड्या वाया गेलास तू…, विजयराव, जयंतराव तुम्ही जेष्ठ आहात, काय पोराटोरांचे ऐकता. थोड आत्मचिंतन करावं. जो, शिसे के घर में रहते हैं वह दूसरों के घर पर पत्थर नहीं मारते हैं असं देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर आता आदित्य ठाकरे याला काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.