मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सहयोगी सदस्य; शिंदेंशी चर्चा केल्यानंतर काय म्हणाले गोकुळ गीते?

मला शिंदे साहेबांच्या भेटीसाठी नंदनवन बंगल्यावर बोलावण्यात आलं. मी एकनाथ शिंदेंसोबत प्रदीर्घ चर्चा केली.

News Photo   2026 06 22T215548.138

नाशिक विधानपरिषद स्थानिक (MLC) स्वराज संस्था मतदारसंघाचे आमदार गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे सहयोगी आमदार म्हणून काम करणार असल्याचं जाहीर केले.

गोकुळ गीते काय म्हणाले?

आज विधानपरिषदेच्या निकालात नाशिकची जागा मी जिंकली, महायुतीचे उमेदवार पराभूत झाले असं गोकुळ गीते म्हणाले. मी आज सकाळी श्रीकांत शिंदे, उदय सामंत, उन्मेष पाटील, सुहास कांदे यांच्या मार्फत संपर्क साधला. त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की मी निवडून आलो आहे,जनतेनं मला मतदार संघातून कौल दिला आहे. विधानपरिषदेत मला आपल्या पक्षाचा सहयोगी म्हणून काम करायचे आहे, अशी इच्छा मी बोलून दाखवल्याचं गोकुळ गीते म्हणाले.

नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव

मला शिंदे साहेबांच्या भेटीसाठी नंदनवन बंगल्यावर बोलावण्यात आलं. मी एकनाथ शिंदेंसोबत प्रदीर्घ चर्चा केली. साहेबांनी मला शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून मला काम करण्यास परवानगी दिली आहे. मी आपणा सर्वांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, असं गोकुळ गीते म्हणाले. भविष्यात जर संघटनेची जबाबदारी दिली तर मी ती सुद्धा पार पाडेल, असंही गीते यांनी म्हटलं.

गोकुळ गीते म्हणाले की मी भाजपचा सक्रीय सदस्य नाही. सुरुवातीपासून भाजपच्या वतीनं मागील काही दिवसांपूर्वी गणेश गीतेंना या जागेवर उमेदवारी देण्याबाबत शब्द देण्यात आला होता. निवडणूक प्रक्रिया ज्या दिवशी सुरु झाली होती त्या दिवशी गणेश गीते आणि मी भेट घेतली होती. त्यांच्याकडे जागा मागितली होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी कमिटमेंट केली होती, दराडेंना या जागेवर उमेदवारी देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. माझ्या भावानं महायुती धर्म पाळला, गणेश गीतेंनी अर्ज मागं घेतला, असं गोकुळ गीते म्हणाले.

माझ्या मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक पुढं नेली होती. गिरीश महाजन यांनी मला विनंती केली होती. प्रचार थांबवला होता, असं गोकुळ गीते म्हणाले. विरोधी उमेदवारानं एका नगरसेवकाशी बोलताना तो काय त्याचा बापपण माघार घेईल, असं म्हटलं होतं. शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून विधानपरिषदेत काम करणार आहे. शिंदे साहेबांनी दराडे साहेबांना विजयी करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला होता. एकनाथ शिंदेंच्या कामानं प्रभावित आहे, ते आलेल्या माणसाला न्याय देतात म्हणून मला पण त्यांच्यासोबत काम करायचं होतं, असं गोकुळ गीते म्हणाले.

follow us