कितीही कारणे द्या,सत्य एकच तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे… ओमराजेंसह सहाही खासदारांवर आदित्य ठाकरेंनी डागली तोफ

UBT Split Aditya Thackeray ओमराजे निंबाळकरांनी पक्ष सोडण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सहाही खासदारांवर तोफ डागली.

UBT Split Aditya Thackeray

Shiv Sena UBT Split Aditya Thackeray fired six MP including Om Raje : शिवसेना (ShivSena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहेत. हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबतची आपली भूमिका प्रथमच स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी ओमराजेंसह सहाही खासदारांवर तोफ डागली.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आज आपला ६० वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या. सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!

काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीची ओमराजे निंबाळकर म्हणाले की, समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. पण निष्ठा असून देखील जर लोकांची कामे करता येत नसतील, तर मतदारांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी किती दिवस फिरणार? या शब्दांत त्यांनी आपल्या राजकीय द्विधा मनस्थितीचे वर्णन केले.

भारतीयांच्या ठेवी पन्नास टक्क्यांनी वाढल्या ! स्विस बँकांची नवी माहिती; या बँकेत भारताचे किती पैसे ?

निंबाळकर यांनी सांगितले की, भावनिक दृष्टिकोनातून पाहिल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटू शकतो, मात्र राजकीय वास्तवाचा विचार केल्यास तो योग्य वाटतो. सध्या ते पुण्यात असून 20 जून रोजी त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागणार आहे. त्यानंतर धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी आपण मोठ्या धर्मसंकटात असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात दबाव येत असल्याची कबुली देत त्यांनी अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नसल्याचे म्हटले आहे.

follow us