“मला कोपऱ्यात कोणी टाकलं रे…, पुढच्या वेळेस लक्षात ठेव…”; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे संतापले!
Eknath Shinde Dussehra Melava; मेळावा संपल्यानंतर मंचाच्या मागे जात असताना एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर नाराजी व्यक्त केली.
Eknath Shinde Dussehra Melava: दसऱ्यानिमित्त मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मात्र, भाषण संपल्यानंतर घडलेल्या एका प्रसंगामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
जिओचा 30,187 कोटींचा आयपीओ आजपासून खुला; गुंतवणूकदारांकडून आधीच हजारो कोटींची गुंतवणूक
मेळावा संपल्यानंतर मंचाच्या मागे जात असताना एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर नाराजी व्यक्त केली. माईकची जागा आणि व्यासपीठावरील व्यवस्थेवरून त्यांनी आयोजकांना सुनावले.
“आयोजन कुणी केलंय? मला कोपऱ्यात टाकलंय. इकडचे लोक मला दिसतच नव्हते. पुढच्या वेळेपासून याची काळजी घ्या. आता तुम्ही मला सांगितलं की मागे वाघ आहे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत, म्हणून तिकडे जायचं. पण पुढच्या वेळेस मी लोकांसमोर पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; दोन तरुणींसह चौघांना अटक, असा रचला हल्ल्याचा कट
हा प्रसंग उपस्थितांसमोरच घडला. त्यानंतर एकनाथ शिंदे आयोजकांना सुनावत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणासोबतच या घटनेचीही चर्चा सुरू झाली आहे.