जिओचा 30,187 कोटींचा आयपीओ आजपासून खुला; गुंतवणूकदारांकडून आधीच हजारो कोटींची गुंतवणूक

Jio Platforms IPO: जिओ (Jio) प्लॅटफॉर्म्सचा बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) आज, 21 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.

Jio Platforms IPO

Jio Platforms IPO: जिओ (Jio) प्लॅटफॉर्म्सचा बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) आज, 21 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओसाठी प्रति शेअर 1,065 ते 1,119 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. आयपीओ खुला होण्याआधीच कंपनीने 212 मोठ्या गुंतवणूकदारांकडून 8,109.84 कोटी रुपये उभे केले आहेत.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; दोन तरुणींसह चौघांना अटक, असा रचला हल्ल्याचा कट

मोठ्या गुंतवणूकदारांचा आयपीओला प्रतिसाद

जिओच्या आयपीओमध्ये ब्लॅकरॉक, फिडेलिटी, जेपी मॉर्गन आणि फ्रँकलिन टेम्पलटन यांसारख्या जागतिक गुंतवणूक कंपन्यांनी रस दाखवला आहे. याशिवाय भारतातील एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या म्युच्युअल फंड कंपन्यांनीही गुंतवणूक केली आहे. एलआयसी आणि विविध विमा व पेन्शन फंडांचाही यात सहभाग आहे.

फडणवीस हिम्मत असेल तर बिष्णोईला साबरमती जेलमधून खेचून आणा ; उद्धव ठाकरेंचे चॅंलेज

अँकर गुंतवणूकदारांकडून या इश्यूला जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांची मागणी मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या आयपीओकडे देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

आयपीओत काय खास?

या आयपीओच्या माध्यमातून जिओ प्लॅटफॉर्म्स 27 कोटी नवीन शेअर्स जारी करणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी 500 कोटी रुपयांचे, तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पात्र भागधारकांसाठी 2,500 कोटी रुपयांचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. पात्र कर्मचाऱ्यांना अंतिम इश्यू किमतीतून प्रति शेअर 54 रुपयांची सवलत मिळणार आहे.

बाथरूममध्ये जाऊन चोरून वडापाव खातो; शिंदे साहेबांवर बोलशील तर याद राख, मेळाव्यात बोलताना कदमांचा पारा चढला

एकूण 30,187.6 कोटी रुपयांचा हा आयपीओ देशातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांनी किंमत, जोखीम आणि कंपनीची माहिती तपासून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

follow us