फडणवीस हिम्मत असेल तर बिष्णोईला साबरमती जेलमधून खेचून आणा ; उद्धव ठाकरेंचे चॅंलेज
Uddhav Thackeray: कुठल्या शहरात नक्षलीवाद आहेत. हे गुंड यूपीकडून आले आहेत. इकडे येताना कळले नाही, जाताना पकडले आहे.
Uddhav Thackeray On Devendra Fadnanvis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यात तब्बत दीड तासच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केलीय.
ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
गेल्या महिन्याच्या पहिला आठवड्यात उच्च न्यायालयात एक दावा दाखल केला आहे. महाराष्ट्र शहरी नक्षलवाद्यांचे केंद्र बनले आहे, असा दावा आहे. कुठल्या शहरात नक्षलीवाद आहेत. हे गुंड यूपीकडून आले आहेत. इकडे येताना कळले नाही, जाताना पकडले आहे.
2019 मध्ये भाजपच्या नावावर लढलात आणि सत्तेसाठी काय केलं?, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
अमित शाहांमुळे गुजरातमध्ये बिष्णोई ठोकळा, फाफडा खात बसला आहे. त्याच्याकडे 70 हजार शुटर्स आहेत, असे म्हणतात. फडणवीस जरा हिम्मत असेल ज्या तुमचा बाप बसलाय दिल्लीत, साबरमतीमधून बिष्णोईला खेचून इकडे आणून बसा. मग गप्पा मारा. कुणाचे रक्त उकळत नाहीत. माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राला शहरी नक्षलवादी केंद्र बोलताना तुमचे जीभ सडत नाही का ?
अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, गुंड, माफियाची टोळी चालवतोय; संजय राऊतांकडून गंभीर आरोप
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात देशात नेतृत्व केले आहे. महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. पण राज्याला कलंक मुख्यमंत्री लावत आहे. काय शहरी नक्षलवादी आहे. मुले रस्त्यावर येत आहेत, कशासाठी येत आहे. मुले तिरंगा घेऊन जात असताना, त्यांना अटक करत आहेत. तिरंगा यात्रा काढणे ,गुन्हा ठरत आहे. लेके रहेंगे आझादी शब्दाचा अर्थ कसा लावायचे आहे, भागवत तुम्ही सांगा.