बाथरूममध्ये जाऊन चोरून वडापाव खातो; शिंदे साहेबांवर बोलशील तर याद राख, मेळाव्यात बोलताना कदमांचा पारा चढला

Ramdas Kadam Dussehra Melawa Speech : मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या दाव्यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 20T202652.519

Ramdas Kadam Dussehra Melawa Speech : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून सवाल उपस्थित केला होता. (Dussehra) यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. “बेईमान माणसा, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलशील तर याद राख, अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांना इशारा दिला. शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांमागे नेमकं काय कारण आहे, असा सवाल करत कदम यांनी जरांगे यांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला.

रामदास कदम म्हणाले की, जरांगे मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी उपोषणाला बसतात, तेव्हा आपण कधीही त्यांना विरोध केला नाही. मात्र, आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत 500 कोटी रुपयांचा आरोप केल्याने आपण बोलत आहोत. जरांगे यांच्यामुळे शिंदे यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल, तर मराठा समाज गप्प बसणार नाही, असा दावा कदम यांनी केला. जरांगे यांच्या उपोषणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, शिंदे यांना जरांगे यांच्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली.

सुषमा अंधारेंचा ठाकरेंच्या मेळाव्यातू फडणवीसांवर हल्लाबोल, बिष्णोई गँगपासून चारा छावण्यांपर्यंत गंभीर आरोप

जरांगे यांची संपत्ती कुठे आहे, ती कोणाच्या नावावर आहे आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर किती मालमत्ता आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही रामदास कदम यांनी केली. “दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या,” असं म्हणत त्यांनी जरांगे यांच्या संपत्तीची तपासणी करण्याची भूमिका मांडली. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांनी दिलं, असं सांगत कदम यांनी शिंदे यांच्या कामाचं समर्थन केलं. तसेच, 500 कोटी रुपयांच्या आरोपातून शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आणि मराठा समाजासाठी महत्त्वाचे नेते असल्याचं सांगत, त्यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरली तर ते सहन केलं जाणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्याबाबत एकेरी भाषेत बोलण्यावरून त्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. मराठा समाजाने न्यायासाठी जरांगे यांना पाठिंबा दिला, त्याचा गैरफायदा घेऊ नये, असंही ते म्हणाले. “एकनाथ शिंदे देणारे आहेत, घेणारे नाहीत. यापुढे गाठ मराठा समाजाशी आणि शिवसैनिकांशी आहे,” अशा शब्दांत रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.

follow us