मुंबईच्या समुद्रात तरंगते होर्डिंग;‘मुंबईकरांवर आणखी एक अन्याय’,आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

Aditya Thackeray Mumbai Sea Floating Hoardings; मुंबईच्या समुद्रात जाहिरातींसाठी तरंगते होर्डिंग लावण्याच्या निर्णयाला आदित्य ठाकरेंचा विरोध.

Aditya Thackeray Mumbai Sea Floating Hoardings

Aditya Thackeray Mumbai Sea Floating Hoardings: मुंबईच्या समुद्रात जाहिरातींसाठी तरंगते होर्डिंग लावण्याच्या निर्णयाला शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. जुहू, वांद्रे आणि वरळी परिसरात हे होर्डिंग लावण्याची योजना असल्याचे वृत्त समोर आले आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहोचेल, अशी भूमिका मांडत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहिले आहे.

शिंदेंची झोळी वर्षभरात ठाकरे बंधूंपेक्षा जास्त भरली; आयोगाने सांगून टाकले आकडे

मुंबईकर आधीच प्रदूषणाचा सामना करत आहेत. त्यात समुद्रात जाहिरातींचे होर्डिंग उभारून नागरिकांवर आणखी अन्याय करू नका, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. शहराच्या सौंदर्यापेक्षा कंत्राटदारांच्या आर्थिक हिताला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

समुद्रात होर्डिंग उभारण्याऐवजी मुंबईतील जाहिरात फलकांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. रात्रीच्या वेळी एलईडी होर्डिंगमुळे नागरिकांना होणारा त्रास रोखावा आणि शहरातील जाहिरात फलकांच्या संख्येवरही मर्यादा घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

नेमका काय आहे निर्णय?

जुहू चौपाटी, वांद्रे-वरळी सी लिंक आणि वरळी जेट्टी परिसरात समुद्रात तरंगते जाहिरात फलक उभारण्याची योजना असल्याचे वृत्त समोर आले आहे. या निर्णयाला आदित्य ठाकरे यांनी आधी समाजमाध्यमांवरून विरोध केला होता. आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि हा निर्णय थांबवण्याची मागणी केली आहे.

विरारमध्ये बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि बहिणीचे मृतदेह, एकाच बिल्डिंगमध्ये वर्षभरात तिसरी आत्महत्येची घटना

समुद्राचे सौंदर्य जपण्याला प्राधान्य द्यावे आणि संभाव्य गैरव्यवहाराच्या आरोपांची दखल घ्यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

follow us