लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू नाही तर हत्या; धक्कादायक कटा’चा उलगडा

जयपूर येथे या 'बिग फॅट वेडिंग'चं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नासाठी चक्क दोन विमानं देखील बूक करण्यात आली होती.

News Photo   2026 06 23T115158.124

लोणावळा येथील प्रसिद्ध लोहगड (Lohagad) किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं लग्न मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. या दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता. जयपूर येथे या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नासाठी चक्क दोन विमानं देखील बूक करण्यात आली होती. मात्र, या भव्य लग्नाआधीच हा धक्कादायक अंत झाला.

पुढील महिन्यात लग्न, जयपुरात कोटींचा पॅलेस अन् 2 विमान बुक पण लोहगडावर भावी पत्नीला गिफ्ट देण्यापूर्वीच प्रसिद्ध बिल्डरलच्या मुलाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळं तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला.

सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या हाय-प्रोफाइल मर्डर मिस्ट्रीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

follow us