पुढील महिन्यात लग्न, जयपुरात कोटींचा पॅलेस अन् 2 विमान बुक पण लोहगडावर भावी पत्नीला गिफ्ट देण्यापूर्वीच प्रसिद्ध बिल्डरलच्या मुलाचा मृत्यू
Ketan Agarwal : भावी पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगडावर गेलेल्या केतनचा 350 फूट खोल दरीत कोसळून
Ketan Agarwal : भावी पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगडावर गेलेल्या केतनचा 350 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह संपूर्ण परिसरात शोकाची लाट पसरली आहे. केतनचं लग्न अवघ्या एक महिन्यावर आलेलं होतं. तर भावी पत्नीचा वाढदिवस 19 जून रोजी. वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता मात्र लोहगडावर फिरता फिरता अचानक पाय घसरल्याने त्याचा 350 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हा प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचा मुलगा असून तो भावी पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेला होता. किल्ल्यावर फिरत असताना केतनचा पाय घसरला आणि तो 350 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि मावळ वन्यजीव संरक्षण संस्थाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आव्हानात्मक बचावकार्यानंतर केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं.
भावी पत्नीचा वाढदिवस अन् महिन्याभरावर लग्न
माहितीनुसार, 19 जून रोजी त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता आणि त्यासाठी त्याने तयारी देखील पूर्ण केली होती. तो लोहगडावर होणाऱ्या पत्नीला गिफ्ट देखील देणार होता मात्र त्याचा पाय घसरल्याने त्याचा मृत्यू झाला. तर पुढील महिन्यात होणाऱ्या लग्नासाठी त्याने जयपूरमध्ये कोट्यवधींचा पॅलेस देखील बुक केला होता. याचबरोबर पाहुण्यांच्या येण्याजाण्यासाठी दोन विशेष विमानांची देखील त्याच्याकडून व्यवस्था करण्यात आली होती.
शेतकऱ्यांनो… ‘या’ दिवशी राज्यात सक्रिय होणार मान्सून; हवामानाकडून दिलासादायक बातमी-
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा तपास देखील सुरु करण्यात आला आहे. माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात घडला.