प्रकृती बिघडल्याने शरद पवार रुग्णालयात दाखल, रुबी हॉल क्लिनिकने दिली महत्वाची माहिती

Sharad Pawar Health : शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुबी हॉल क्लिनिककडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 02T190200.200

Sharad Pawar Health : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. (Sharad Pawar) शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुबी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. मात्र, पवारांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटवरून माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, बाबांना खोकल्याचा त्रास झाल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू असून, प्रकृतीशी संबंधित सर्व निकष स्थिर आहेत. आपल्या काळजीपोटी केलेल्या चौकशीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार असं त्या म्हणाल्या आहेत.

रुबी हॉल क्लिनिकने काय सांगितलं?

रुबी हॉल क्लिनिककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना आज दुपारी 3 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत दुखत असल्याने वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यांची सिटी स्कॅन तपासणीही पूर्ण झाली असून, सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचं कारण नसल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

शरद पवार यांच्यावर औषधोपचार सुरू असून, त्यांना कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेची गरज नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. औषधांनी त्यांची प्रकृती सुधारेल आणि पुढील एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

follow us