Sharad Pawar On NDA : तुम्ही भूमिका बदलणार अन् एनडीएत जाणार? शरद पवार म्हणाले…
Sharad Pawar On NDA : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असून खासदार सुप्रिया सुळे केंद्रात तर राज्यात
Sharad Pawar On NDA : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असून खासदार सुप्रिया सुळे केंद्रात तर राज्यात आमदार जयंत पाटील मंत्री होणार असल्याची चर्चा जोराने सुरु आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असं देखील सांगितलं जात आहे. मात्र आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही आमची भूमिका बदलणार नाही आणि कुठेही जाणार नाही असं पक्षाच्या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर (Silver Oak) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विलीनीकर करण्यासाठी आणि एनडीएसोबत (NDA) जाण्यासाठी दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे मात्र असं काहीच होत नसून आम्ही आमची भूमिका बदलणार नसल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
पक्षाच्या बैठकीत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, सध्या आपल्याबाबत वेगवेगळ्या उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. पण मी स्पष्ट करतो की, आपण कुठेही जाणार नाही. ज्यांंना आमच्यासोबत यायचे असेल त्यांनी यावे, आम्ही मात्र आमची भूमिका बदलणार नाही आणि कुठेही जाणार नाही असं या बैठकीत शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे शरद पवार गट एनडीएसोबत जाणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. अनेक अनेक चर्चांना देखील पूर्णविराम मिळाले आहे.
पुण्यात पोलिसांवर मोठी कारवाई! अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणी 15 जणांच्या तडकाफडकी बदल्या-