31 वर्षांत जमवली 4.37 कोटींची बेहिशेबी मालमत्ता; कृषी अधिकाऱ्यासह पत्नीवर गुन्हा
कृषी विभागातील वर्ग-1 अधिकारी किरण जाधव यांची 4.37 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड. ACB कडून अधिकारी आणि पत्नीसह गुन्हा दाखल.
पुणे: कृषी उपसंचालक किरण श्यामराव जाधव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. तब्बल 4 कोटी 37 लाख 84 हजार 930 रुपयांची अपसंपदा धारण केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीत उघडकीय आली आहे. कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 128.7 टक्के अधिक मालमत्ता आढळल्याने जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किरण जाधव हे सध्या सोलापूरमधील आत्माचे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.
शाहरुख खानच्या ‘किंग’ने रिलीजआधीच रचला इतिहास! परदेशी वितरण हक्कांची 175 कोटींना विक्री
31 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 2 डिसेंबर 2025 रोजी महासंचालकांकडून किरण जाधव यांच्या मालमत्तेबाबत उघड चौकशी करण्याचे आदेश मिळले. त्यानंतर एसीबीने त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची सविस्तर तपासणी केली. 4 जून 1994 ते 2 डिसेंबर 2025 या तब्बल 31 वर्षांच्या कालावधीतील उत्पन्न आणि मालमत्तेची पडताळणी करण्यात आली. या चौकशीत जाधव यांनी ज्ञात व वैध उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा 4 कोटी 37 लाख 84 हजार 930 रुपयांची अधिक मालमत्ता भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले. ही अपसंपदा त्यांच्या वैध उत्पन्नाच्या 128.7 टक्के अधिक असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
‘मतं वाचवा नव्हे, घुसखोरांना वाचवण्याची रॅली होती’; अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
पत्नीवरही अपप्रेरणा दिल्याचा आरोप
या प्रकरणात किरण जाधव यांच्या पत्नी संगीता जाधव यांनी बेहिशेबी मालमत्ता धारण करण्यासाठी अपप्रेरणा दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.