Baramati Rain : बारामतीत जोरदार पाऊस, 158 मिमी पावसाची नोंद; शाळांना सुट्टी जाहीर
Baramati Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले असून शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारकडे पाहात आहे.
Baramati Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले असून शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारकडे पाहात आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. बारामती तालुक्यात अवघ्या काही तासांत 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बारामतीत अचानक पावसाचा जोर वाढल्याने नगपालिकेच्या शांळाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बारामतीत (Baramati Rain) 2 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून दोन ते तीन तास सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून सकाळी सातपर्यंत शहरात 158 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे.
नीरा देवघर धरणातून 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग
तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर अचानक वाढल्याने नीरा देवघर धरणातून 750 क्युसेक वेगाने नीरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पिके वाचवण्यासाठी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. दुष्काळात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
पुणे शहरातही जोरदार पाऊस
सोमवारी आठवड्याचा पहिला कामकाजाचा दिवस असल्याने सकाळपासूनच नोकरी, व्यवसाय तसेच शाळा-महाविद्यालयांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची वर्दळ रस्त्यांवर होती. त्यातच अचानक पावसाचा (Pune Rain) जोर वाढल्याने दुचाकीस्वारांसह पादचारी आणि वाहनचालकांची मोठी धावपळ झाली. अनेकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानांचा आडोसा आणि सुरक्षित ठिकाणांचा आधार घेतला.
शहरातील मध्यवर्ती भागांबरोबरच विविध उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत होता. परिणामी, सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा वेगही प्रभावित झाला.
विक्रमी कामगिरी, कार विक्रीने पहिल्यांदाच ओलांडला 5 लाखांचा टप्पा-
सलग सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पावसाची अखंडित हजेरी आणि सकाळच्या सुमारास वाढलेल्या तीव्रतेमुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.