October Car Sales : विक्रमी कामगिरी, कार विक्रीने पहिल्यांदाच ओलांडला 5 लाखांचा टप्पा
October Car Sales : ऑक्टोबर 2026 मध्ये भारतीय ऑटोबाजारात मोठ्या प्रमाणात कार खरेदी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात भारतीय बाजारात
October Car Sales : ऑक्टोबर 2026 मध्ये भारतीय ऑटोबाजारात मोठ्या प्रमाणात कार खरेदी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात भारतीय बाजारात पहिल्यांदाच कार विक्री 5 लाखांच्यावर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या डीलरकडे सुमारे 5.25 लाख ते 5.30 लाख कार्स पाठवली आहे. 2025 ऑक्टोबर महिन्यात भारतीय बाजारात 4.68 लाख कार्सची विक्री करण्यात आली होती. ऑक्टोबर 2025 च्या तुलनेतही वाढ सुमारे 12-13 % इतकी आहे. या कामगिरीमुळे जुलै 2026 मध्ये नोंदवलेला 4.69 लाख वाहनांच्या विक्रीचा जुना विक्रम मागे पडला आहे.
सणासुदीच्या काळात मागणीत मोठी वाढनवरात्री आणि दसऱ्यासारख्या सणांमुळे ऑक्टोबर महिन्यात कार विक्रीला मोठी चालना मिळाली आहे. ‘मनीकंट्रोल’ (Moneycontrol) ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्टोबर 2026 मध्ये कार खरेदी करण्याबाबत ग्राहकांमध्ये उत्साह दिसून आला. ‘जीएसटी 2.0’ (GST 2.0) अंतर्गत झालेले बदल, रेपो दरात कपात आणि प्राप्तिकरात मिळालेली सवलत यामुळे ग्राहकांना अतिरिक्त फायदा झाला.
विक्रमी कामगिरी: मारुतीपासून कियापर्यंत
देशातील पाच प्रमुख कार उत्पादक कंपन्या मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्युंदाई मोटर इंडिया आणि किया इंडिया यांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली. या प्रत्येक कंपनीने मागील कालावधीच्या तुलनेत आपल्या डीलरकडे अधिक संख्येने वाहने पाठवली आहेत.
मारुतीची विक्री 20.45 टक्क्यांनी वाढली आहे. मारुती सुझुकीने ऑक्टोबर महिन्यात आपल्या डीलर नेटवर्कला एकूण 2.12 लाख कार्स पाठवली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ही संख्या 1.76 लाख युनिट्स इतकी होती. म्हणजेच, कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 20.45 टक्क्यांची वाढ झाली आहे.