अहान शेट्टीच्या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट ‘सनकी’च्या चित्रीकरणाला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार

Ahan Shetty Sanki Movie: अभिनेता अहान शेट्टी लवकरच त्याच्या आगामी ‘सनकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

Ahan Shetty Sanki Movie

Ahan Shetty Sanki Movie: ‘बॉर्डर 2’च्या यशानंतर अहान शेट्टी पुन्हा एकदा अ‍ॅक्शनच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. अभिनेता लवकरच त्याच्या आगामी ‘सनकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. ‘रुस्तम’ आणि ‘मिशन रानीगंज’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे टीनू सुरेश देसाई या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत मोबाइल-लॅपटॉप चार्जिंग बंद, रेल्वे बोर्डाचे कडक निर्देश

ज्ञानेंद्र वासुदेव यांनी लेखन केलेला ‘सनकी’ हा मुळात एक प्रेमपट आहे. या चित्रपटात भावनांसोबतच दमदार आणि थरारक अ‍ॅक्शनही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला 30 ऑक्टोबरपासून भोपाळमध्ये सुरुवात होणार आहे.

‘बॉर्डर 2’मधील अभिनय आणि चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर अहानने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची निवड अत्यंत विचारपूर्वक केली आहे. आता ‘सनकी’च्या माध्यमातून तो आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तो विक्रम भट्ट यांच्या ‘1920 कोल्ड विंटर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्या आणखी काही चित्रपटांच्या चित्रीकरणाला 2027 मध्ये सुरुवात होणार आहे.

’50 लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्यावर मोक्का लावू’…नगर तालुका पोलिसांची थेट शरद पवारांना धमकी?

दिग्दर्शक टीनू सुरेश देसाई आपल्या मोठ्या टीमसह आधीच भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. 30 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी ते सर्व तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत.
सध्या चित्रपटाची कथा आणि विषय गुप्त ठेवण्यात आला आहे. चित्रपटाशी संबंधित विविध गोष्टींचा खुलासा निर्माते टप्प्याटप्प्याने करणार आहेत.

‘सनकी’ या चित्रपटाची निर्मिती वी द पीपल, रोअरिंग रिव्हर प्रॉडक्शन्स आणि पाल्स अँड पीअर्स एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

हा चित्रपट 2027 च्या पहिल्या सहामाहीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us