मोठी बातमी! पहिलं टार्गेट अभिनेता टायगर श्रॉफ नव्हताच, गोळीबार प्रकरणात आरोपींचा धक्कादायक खुलासा

टायगर श्रॉफच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात आरोपींच्या मूळ निशाण्यावर दुसरीच व्यक्ती असल्याचा धक्कादायक खुलासा प्राथमिक चौकशीत समोर आला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 20T185638.994

अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार (Mumbai) प्रकरणात आरोपींच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोपींच्या मूळ निशाण्यावर टायगर श्रॉफ नव्हता, तर मुंबईतील दुसरीच एक मोठी व्यक्ती होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, ठरवलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं कठीण वाटू लागल्याने आरोपींनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचं चौकशीत सांगितल्याचं वृत्त आहे.

मुंबईत आल्यानंतर आरोपींनी बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टायगर श्रॉफवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपींनी त्याच्या आणि चाहत्यांच्या इन्स्टाग्रामवरील रील्सचा आधार घेतला. टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसल्याचं सोशल मीडियावरील व्हिडिओंमधून लक्षात आल्याने त्याला लक्ष्य केल्याचं आरोपींनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून, त्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. मुंबईत येण्यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तीला लक्ष्य करण्याचा कट आखण्यात आला होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नियोजित व्यक्तीपर्यंत पोहोचणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपींनी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचं ठरवल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे आरोपींना टायगर श्रॉफ पुष्पा पार्क परिसरात असल्याचं समजल्याचं सांगितलं जात आहे. या गोळीबार प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याची माहितीही यापूर्वी समोर आली होती. आता आरोपींच्या मूळ निशाण्यावर असलेली व्यक्ती नेमकी कोण होती, याचा तपासातून काय खुलासा होतो, याकडे लक्ष लागलं आहे.

follow us