रणबीर कपूरही होता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर; घराची रेकी केल्याची माहिती

Tiger Shroff Firing Case Ranbir Kapoor: बिश्नोई गँगने रणबीर कपूरच्या घराचीही रेकी केल्याचा माहीती समोर आला आहे.

Bishnoi Gang Allegedly Conducted Recce of Ranbir Kapoor’s House in the Tiger Shroff Firing Case:

Bishnoi Gang Allegedly Conducted Recce of Ranbir Kapoor’s House in the Tiger Shroff Firing Case: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू असताना बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याचे नाव चर्चेत आले आहे. टायगरला लक्ष्य करण्यापूर्वी हल्लेखोरांनी रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घराचीही पाहणी केली होती. याआधी अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या घरांची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आजोबा-नातवाच्या नात्यातील गोडवा उलगडणार, ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित

सलमान खान होता मेन टारगेट?

हल्लेखोरांच्या निशाण्यावर सुरुवातीला अभिनेता सलमान खान होता. त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्स परिसरातील कडक सुरक्षा व्यवस्था पाहून हल्लेखोरांनी दुसऱ्या अभिनेत्याला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

सलमान खानव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि रणबीर कपूर यांच्या निवासस्थानांची रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या सर्व कलाकारांवर हल्ला करण्याचा निश्चित कट होता का, हे तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

राज्यात शाळांना दिवाळीची 13 दिवसांची सुट्टी ;16 नोव्हेंबरपासून पुन्हा वर्ग सुरू

टायगर श्रॉफच्या दिनक्रमाची घेतली माहिती?

18 ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात अभिनेता बचावला, मात्र त्याचा चालक जखमी झाला.  टायगरच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्याच्या नियमित दिनक्रमाची माहिती मिळवण्यात आल्याचा संशय आहे. तो रविवारी खेळण्यासाठी बाहेर जात असल्याची माहिती हल्लेखोरांना मिळाली होती, असा दावा केला जात आहे.

 हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या अनिल पंडितने सोशल मीडिया पोस्टद्वारे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सलमान खानसोबत काम करण्याबाबत टायगरला यापूर्वी इशारा दिल्याचा दावाही त्या पोस्टमध्ये करण्यात आल्याचे सांगितले जाते. सलमानसोबत काम करणाऱ्या कलाकारांना लक्ष्य करण्याची धमकी असलेली कथित व्हॉइस नोटही समोर आली आहे.

प्रकरणात 10 जणांना अटक झाल्याची माहिती

या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक झाल्याची माहिती आहे. कोटा येथून ताब्यात घेण्यात आलेले तीन संशयित शूटर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, शस्त्रांची व्यवस्था करण्यात मदत केल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी आणखी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

जितेंद्र आव्हाडांना धमकी देणारा पुण्यातून ताब्यात; घरमालकानेच ओळखलं आरोपीचं कृत्य

दरम्यान, रणबीर कपूरसह इतर कलाकारांच्या घरांची रेकी केल्याच्या वृत्तांमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

follow us