लाडक्या बहिणींनो, खात्यात जमा होणार 3 हजार रुपये ; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय?
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची लोकप्रिय योजनेपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आतापर्यंत जमा न झाल्याने विरोधक
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची लोकप्रिय योजनेपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आतापर्यंत जमा न झाल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात आतापर्यंत सरकारकडून हप्ता जमा न झाल्याने लाडक्या बहिणी देखील नाराज होताना दिसत आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत राज्य सरकारकडून देखील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.
या अपडेटनुसार, सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) बँक खात्यात दसऱ्यानंतर जमा होण्याची शक्यता आहे. मागील दोन महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याने यावेळी देखील ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दसऱ्यानंतर (Dussehra) मंत्रिमंडळ बैठक असल्याने या बैठकीत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून 25 ऑक्टोबरनंतर लाडक्या बहिंणीच्या बँक खात्यात (Bank Accounts) पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे जर ऑक्टोबरच्या (October) शेवटच्या आठवड्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झाला नाही तर नोव्हेंबरमध्ये दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र खात्यात जमा होऊ शकतात अशी देखील सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी (Diwali) असल्याने महिलांना आर्थिक मदत म्हणून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यात 3 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.
मालेगाव सुपारी प्रकरणात मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंचा दणका; FDA च्या 5 अधिकाऱ्यांवर निलंबन
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत 1 कोटी 66 लाख पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळतो. ई-केवायसीनंतर 80 लाखांपेक्षा जास्त महिला या योजनेतून बाहेर झाल्याची माहिती देखील राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.