लाडक्या बहिणींनो, ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 1500 ; CM फडणवीस आज घेणार मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली असून आतापर्यंत सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने विरोधक देखील राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार आज सप्टेंबर महिन्याच्या हप्तावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वितरित करायचा यावर निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात (Ladki Bahin Yojana) नवरात्र (Navratri) आणि दसरा (Dussehra) असल्याने सणासुदीच्या या काळात महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार 20 तारखेनंतर महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात करु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी देखील राज्य सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते विविध सणांचे औचित्य साधून महिलांच्या खात्यात जमा केले होते. यावेळी देखील राज्य सरकार दसराच्या जवळजवळ महिलांच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात पैसे जमा करु शकते.

विवेकानंद पाटील यांना घर बांधून देणार, विश्वजीत कदमांची मोठी घोषणा

तर दुसरीकडे ई-केवायसीनंतर राज्यातील तब्बल 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार दरमहा 1500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करते.

follow us