Udhav Thackeray : संघाच्या मेहनतीला लागलेले भाजप विषारी फळच; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा घणाघात…

संघाच्या मेहनतीला लागलेले भाजप विषारी फळच असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यातून केलायं.

Udhav thackeray

Udhav Thackeray On BJP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेहनतीला आलेले विषारी फळ म्हणजे भाजप, अशी घणाघाती टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांनी केलीयं. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात काल दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर निशाणा साधलायं.

पुढे निवडणुका नाही, असं त्यांना वाटतंय; पंकजाताईंच्या मेळाव्याला दांडी मारणाऱ्यांना धनंजय मुंडेंनी सुनावले !

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजप म्हणजे आता अमिबा झाला आहे. वाटेल तसं वेडेवाकडं कसंही पसरतो. कोणाशी पण युती करतो, शरिरात घुसले की बिघवडते. मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहे. इंडिया टुडेने एक सर्व्हे केलाय. मोस्ट पॉप्युलर सीएम. आपल्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये होता. आजच्या सर्वेमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, ममता बॅनर्जी असल्याचं ते ठाकरे म्हणाले आहेत.

मोठी बातमी! 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार, काय दिली हवामान खात्याने माहिती?

तसेच निवडणूक तुम्ही लावाच. जनता वाट बघतेय. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई. मेट्रो अन् मोनो रेलपेक्षा बोटसेवा सुरू करा, असं देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. निवडणुका जवळ येत आहेत, तसे भाजपवाले हिंदु-मुसलमान करायला लागले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

किरेन रिजिजूंना लाथ मारुन हाकलून का देत नाही…
महाराष्ट्रात गोमांसला बंदी करण्यात आलीयं. तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशात ते गोमांस खात असल्याचं जाहीरपणे सांगत आहेत. भाजपचे मंत्री किरेन रिजिजूंना भाजपवाले लाथ मारुन का हाकलून देत नाहीत? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केलायं.

एकाच दिवसात एसटी महामंडळाला उपरती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशनानंतर भाडेवाढ रद्द

आज सगळीकडे चिखल झालाय, याचं कारण कमळाबाई (BJP). कारण कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली, परंतु जनतेच्या जीवनाचा चिखल झालाय. घरादारासह चिखल झालाय, शेती वाहून गेली. अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नव्हती, असं देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

टिळा-टिकली लावू नका, अन्यथा.. कल्याणच्या केसी गांधी शाळेचा अजब फतवा, पालक आक्रमक

दरम्यान, दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर 50 हजार रुपये मदत तत्काळ जाहीर करण्याची मागणी केलीयं.

follow us