पुढे निवडणुका नाही, असं त्यांना वाटतंय; पंकजाताईंच्या मेळाव्याला दांडी मारणाऱ्यांना धनंजय मुंडेंनी सुनावले !

Dhananjay Munde: मागच्या दसरा मेळाव्यातील अनेक जण आज दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतंय. पण एक लक्षात ठेवा.

  • Written By: Published:
pankaja munde dasara melava Dhananjay Munde on maratha leader

Dhananjay Munde: सावरगाव येथील भक्तीगडावर भाजप नेत्या व पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला राज्यभरातील काही आमदार, काही नेते येत असतात. त्यात मराठा नेतेही असतात. अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील नेतेही पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर असतात. परंतु यंदा पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर जाणे अनेक नेत्यांनी टाळले आहे. त्यावरून राष्ट्रवादी नेते व आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यावर अशा नेत्यांना भाषणातून फटकारले आहे.


Video : मागच्या वर्षीपासून दसरा मेळाव्याला हलकं वागणारे लोक…, गोंधळ घालणाऱ्यांवर पंकजा मुंडे संतापल्या


संघाचं शताब्दी वर्ष पाहण्याचं सौभाग्य आम्हा स्वयंसेवकांना लाभलं; पंतप्रधानांनी लिहला RSS’वर खास लेख

धनंजय मुंडे म्हणाले, मागच्या दसरा मेळाव्यातील अनेक जण आज दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतंय. पण एक लक्षात ठेवा. कुणी जर हा विचार घेऊन भगवान बाबांच्या भक्तांना, मुंडेंच्या कार्यकर्त्यांना संपवायला निघाले असती तर त्यांना दहा जन्मही संपविता येणार नाही. काही जण म्हणाले मुंडेसाहेबांचे सगळं संपलं आहे. पण माझ्या बहिणींनी त्यांचा वारसा पुढे नेला आहे. (pankaja munde dasara melava Dhananjay Munde on maratha leader)

मराठा समाजाला आरक्षण दिलंय, याचा आनंद आहे. पण काही जणांना ओबीसीआडून आरक्षण घ्यायचे आहे. एमपीएससीचा ओबीसीचा कट ऑफ 485 मार्क इतका होता. तर आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ews कट 450 इतका होता. प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आले तरी 480 मार्क मिळून नापास झाले आहे हे लक्षात घ्या. काही ठराविक लोकांनी स्वतःला खुर्ची मिळविण्यासाठी वाद सुरू केलाय, असे धनंजय मुंडे यांनी आपला भाषणात म्हटलंय.

आम्हाला कुणाच्या आरक्षणासा विरोधत नाही. आणखीन आरक्षण द्या. पण याच्या ताटातील काढून दुसऱ्याचा ताटात नको आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. मी मागच्या अडीचशे दिवसात वाइट अवस्थेत होतो. माझी बहिण तासांनतास माझ्याजवळ बसून होती. मला आधार देत होती. ज्या काळात माझ्याविरोधात माध्यमे मीडिया ट्रायल करत होती. काही जणांनी माझ्याविरोधात घोटाळा काढला. कोर्टात गेले, कोर्टाने मला क्लीनचिट दिली. जो कोर्टात गेला त्याला लाख रुपयाची दंड झाला. एेवढे होऊन मी शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या, असे भावूकही धनंजय मुंडे झाले.

follow us