Sonia Gandhi Book : दोन लाख प्रती, 26 कोटींचं उत्पन्न; सोनियांना किती पैसे मिळणार?

Sonia Gandhi सोनिया गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकाच्या अवघ्या सात दिवसांत तब्बल 2 लाखांहून अधिक प्रतींची विक्री...

  • Ninad K
  • Written By: Published:
Sonia Gandhi Book

Sonia Gandhi Book Royalty Calculation : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पण या लोकप्रियतेसोबतच चर्चेत आहे ती पुस्तकाच्या कमाईची… या पुस्तकाची किंमत आहे 1,299 रुपये… आणि अवघ्या सात दिवसांत विकल्या गेल्या तब्बल 2 लाखांहून अधिक प्रती… म्हणजेच पुस्तकाच्या विक्रीतून जवळपास 26 कोटी रुपयांचा व्यवसाय झालायं… आता प्रश्न असा आहे की, या पुस्तकाच्या माध्यमातून सोनिया गांधींच्या खिशात नेमके किती पैसे जाणार आहेत?

या पुस्तकाने रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्याच्या आत विक्रीचे अनेक विक्रम केल्याचा दावा प्रकाशक HarperCollins India चे CEO अनंत पद्मनाभन यांनी केला आहे. विशेष म्हणजे, रिलीजच्या दिवशी अवघ्या 10 मिनिटांत 15 हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्याची माहितीही समोर आली आहे.

आता या पुस्तकाची हार्डकव्हर आवृत्ती 544 पानांची असून त्याची मूळ किंमत आहे 1,299 रुपये. जर, आपण, पुस्तकाच्या 2 लाख प्रति विकल्या गेल्या आणि प्रत्येक प्रत 1,299 रुपयांना विकली गेली, असं गृहीत धरलं तर… एकूण विक्रीचा अंदाज 2,00,000 प्रति × 1,299 रूपये म्हणजेच अवघ्या सात दिवसांत जवळपास 26 कोटी रुपयांची विक्री…

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पुस्तकांच्या विक्रीतून जमा झालेले कोट्यवधी रूपये सोनिया गांधींना मिळणार का? तर, जरा पॉज घ्या… हे संपूर्ण 26 कोटी रुपये सोनिया गांधींना अजितबात मिळणार नाहियेत.  कारण पुस्तकाच्या एकूण विक्रीतून प्रकाशक, वितरक आणि विक्रेत्यांचाही हिस्सा असतो आणि लेखकाला मिळते ती रॉयल्टी.

भारतात हार्डकव्हर पुस्तकांसाठी साधारणपणे 10 ते 12.5 टक्के रॉयल्टीचा अंदाज धरला जातो. काही लेखकांना 15 टक्क्यांपर्यंत रॉयल्टी मिळू शकते. आता याच दराने सोनिया गांधींच्या संभाव्य रॉयल्टीचं गणित मांडलं तर, 2 लाख प्रतींच्या विक्रीवर 10 टक्के रॉयल्टीने ₹2.60 कोटी, 12.5 टक्के रॉयल्टीने ₹3.25 कोटी तर, 15 टक्के रॉयल्टी दिल्यास ₹3.90 कोटी होतात. आता हे आकडे MRP वर आधारित आहेत. प्रत्यक्ष रॉयल्टी करार आणि निव्वळ विक्रीच्या गणनेनुसार बदलू शकते. पण काही मिनिटांसाठी मांडलेलं गणित गृहित धरलं तर, या अंदाजानुसार सोनिया गांधींना पुस्तकाच्या रॉयल्टीतून 2.60 कोटी ते 3.90 कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.  मात्र, सोनिया गांधी आणि HarperCollins India यांच्यात झालेल्या कराराच्या अटी आणि रॉयल्टी अद्याप सार्वजनिक करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कमाईचा अचूक आकडा सांगणे थोडे कठीण आहे.

याशिवाय  प्रसिद्ध लेखकांना पुस्तक प्रकाशित होण्याआधीच मोठी रक्कम अडव्हान्स म्हणून दिली जाते. याला अडव्हान्स रॉयल्टी असं म्हटलं जातं. म्हणजे पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रॉयल्टी आधी दिलेल्या अडव्हान्समध्ये समायोजित केली जाते. मात्र सोनिया गांधींना या पुस्तकासाठी किती अडव्हान्स मिळाला, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही. पण एक गोष्ट नक्की… पुस्तकांच्या बाजारातही लोकप्रियतेचं रूपांतर कोट्यवधींच्या व्यवसायात कसं होऊ शकतं, हे सोनिया गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकाच्या होणाऱ्या विक्रीतून समोर आलयं.

follow us