सातारानंतर सांगलीतही भाजपला धक्का; जिल्हा बँकेवर काँग्रेसचा झेंडा, महेंद्र लाड अध्यक्षपदी
Sangli District Bank : सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना नेत आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी खेळी करत भाजपला
Sangli District Bank : सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना नेत आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी खेळी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने बाजी मारली आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून तर शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील भाजपला धक्का बसला आहे. आज झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे.
काँग्रेस नेते महेंद्र लाड (Mahendra Lad) यांची सांगली जिल्हा बँकेच्या (Sangli District Bank) अध्यक्षपदी तर शिवसेना (Shivsena) नेते तानाजी पाटील (Tanaji Patil) यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तब्बल 22 वर्षांनंतर सांगली जिल्हा बँकेवर काँग्रेसचा (Congress) झेंडा फडकला आहे. निवडणुकीत आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या नेतृत्वात काँग्रेसने बाजी मारली होती. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील 21 पैकी 15 संचालक बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित सहा जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) , राष्ट्रवादीचे संजय पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यासह इतर उमेदवार विजयी झाले होते.
पंतप्रधान मोदींचे 81 देशांचे दौरे अन् 900 कोटी खर्च; संसदेत परदेश दौऱ्यावर माहिती
काँग्रेसचे सर्वाधित संचालक असल्याने काँग्रेसकडून अध्यक्ष पदावर दावा करण्यात आला होता. तर आज काँग्रेस नेते महेंद्र लाड यांची सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तर शिवसेना नेते तानाजी पाटील यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.