विवेकानंद पाटील यांना घर बांधून देणार, विश्वजीत कदमांची मोठी घोषणा
Vishwajeet Kadam On Vivekanand Patil : एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून पुण्यात
Vishwajeet Kadam On Vivekanand Patil : एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विश्वजीत कदम देखील या आंदोलनात सहभागी होत विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनातून एमपीएससी (MPSC) विद्यार्थी विवेकानंद पाटील देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे.
कोल्हापूर शैलीत करत असलेल्या भाषणामुळे सध्या संपूर्ण राज्यात विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) चर्चेत आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकतंच त्यांच्या घराचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अगदी साध्या पद्धतीने पत्र्याच्या घरात राहणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्यासाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी मोठी घोषणा केली आहे.
विश्वजीत कदम यांनी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या विवेकानंद पाटील आणि त्यांच्या कुटुंबासाठी नवीन घर बांधून देण्याची जबाबदारी घेतली आहे. याबाबत त्यांनी आंदोलनात बोलताना मोठी घोषणा केली.
यावेळी विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) म्हणाले की, विवेकानंद पाटील दररोज 3-4 तास भाषण करत सर्वांना आपल्या प्रेमात पाडलं आहे. त्यांच्याबद्दल आज मला कोणीतरी एक व्हिडिओ दाखवला. विवेकानंद पाटील यांच्या घरातला तो व्हिडिओ आहे. त्यांनी जी बक्षिसे मिळवली आहेत तीदेखील त्याच घरात आहेत. आज मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने येणाऱ्या काही दिवसांतच विवेकानंद पाटील आणि त्यांच्या आई वडिलांसाठी नवीन आणि चांगलं घर बांधण्याची जबाबदारी विश्वजीत कदमांची असेल.
तुकाराम मुंढेंची न्यूयॉर्क टाईम्समध्ये दखल; ‘रॉकस्टार’ म्हणत केलं कौतुक-