TYFC Collection : प्रेक्षकांना भावला नाही ‘थॅंक यू फॉर कमिंग’; जाणून घ्या कमाई

TYFC Collection : प्रेक्षकांना भावला नाही ‘थॅंक यू फॉर कमिंग’; जाणून घ्या कमाई

TYFC Collection : ‘थॅंक यू फॉर कमिंग’ (TYFC Collection) या चित्रपटाची देखील रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडींग’ चित्रपटाप्रमाणे चांगलीच चर्चा झाली. तसेच ‘वीरे दी वेडींग’ आणि ‘थॅंक यू फॉर कमिंग’ ची तुलना देखील झाली. कारण याही चित्रपटामध्ये पाच अभिनेत्रींची धम्माल पाहायला मिळाली आहे. तशीच ती ‘वीरे दी वेडींग’मध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्करची पाहायाला मिळाली होती. आता या चित्रपटात देखील महिला केंद्रीत विषय आहे. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना म्हणावासा भावला नसल्याचं दिसत आहे.

रिलीजच्य दिवसापासूनच तिकीट विक्रीसाठी धडपड

हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच तिकीट विक्रीसाठी धडपडतोय. त्यामुळे चित्रपटाची कमाई केवल लाखांमध्येच राहिली आहे. तर पाचव्या दिवशी या चित्रपटाने अत्यंत कमी कमाई केली आहे. तर सहाव्या दिवशी देखील चित्रपटाने केवळ 35 लाखांची कमाई केली. तर या चित्रपटाची एकुण कमाई 4.30 कोटी झाली आहे. तर रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ 8 लाखांची कमाई केली होती.

Chitra Wagh : तुमची चॉईसचं वेगळी आहे…; मोठ्या ताई म्हणत चित्र वाघांचा सुप्रिया सुळेंवर ‘वर्मी’ घाव

6 ऑक्टोबर रोजी “थँक यू फॉर कमिंग” चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. नवोदित दिग्दर्शक करण बुलानी यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि अनिल कपूर आणि रिया कपूर यांच्या AKFCN निर्मित या चित्रपटात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला आणि शिबानी बेदी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अनिल कपूर आणि करण कुंद्रा देखील आहेत.

Bhumi Pednekar : लाल ड्रेसमध्ये भूमीचं जबरदस्त फोटोशुट, अदा पाहून चाहते घायाळ

निर्माती रिया हिचा सुरुवातीपासूनच नेहमीच महिला-केंद्रित चित्रपटांशी संबंधित आहे. Aisha, जेन ऑस्टेनच्या एम्मा चे अधिकृत रुपांतर, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, खूबसूरत, आणि वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटांपर्यंत, प्रॉडक्शन हाऊसने महिला नायक आणि त्यांच्या कथांवर लक्ष केंद्रित करणारे चित्रपट बनवले आणि ते सुपरहिट ठरले.

नेटिझन्सने ट्विटरसह विविध सोशल प्लॅटफॉर्मवर जाऊन चित्रपटाच्या रिलीजबद्दल कौतुक केलं. अनिल कपूरच्या AKFCN ने विशिष्ट कथा दाखविण्याच्या बांधिलकीसाठी ओळख मिळवली आहे बहुतेकदा महिलांवर केंद्रित आहे आणि “थँक यू फॉर कमिंग” सह कपूरने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube