राज्यात गतीमान नागरी सेवा पुरस्कार अजितदादांच्या नावे देणार; CM फडणवीसांची मोठी घोषणा
Maharashtra Budget : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री
Maharashtra Budget : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य स्मारक उभारणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच गतीमान नागरी सेवा पुरस्कार अजितदादांच्या नावे देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच संत गाडगेबबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार, ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार. महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचेही फडणवीसांनी जाहीर केले.
माझं अंतःकरण जड झालं आहे. अजित दादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करड्या स्वभावामुळे प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमतेची परंपरा कायम राहिली. त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करण्यात येईल. हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हा अर्थसंकल्प 2024 च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. 2026-27 सामाजिक समरसता वर्ष म्हणुन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पुर्ण झालं असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इराणनंतर नेक्स्ट टार्गेट कोण? ट्रम्पने सांगितलं ‘या’ देशाचे नाव-
28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एका विमान अपघातात निधन झालं होतं. अजित पवार बारामती येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आयोजित एका सभेला जात होते मात्र विमान अपघातात अजितदादांचं निधन झालं.
