पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे असणार; मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट

आज मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.

News Photo   2026 07 21T160621.658

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर (Rain) विस्कळीत स्वरूपाचा पाऊस झाला. आता मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. 21 जुलै ते 26 जुलैपर्यंत कोकण ,गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या गुजरात किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर भागात आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21 ते 25 जुलै दरम्यान नैऋत्य मोसमी वारे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर कायम राहणार आहेत. परिणामी, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार त्याला ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात ही पावसाचा जोर वाढणार असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.

जास्त तेल ओताल तर जळून खाक व्हाल, जंतरमंतरवरून संजय राऊतांची मोदी सरकारविरोधात मोठी घोषणा

follow us