गोंदिया-गडचिरोलीला यलो अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांतही सरींचा अंदाज

Maharashtra Weather Today गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट, तर हिंगोली, लातूर आणि नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज.

Maharashtra Weather Today

Maharashtra Weather Today Update: राज्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी विविध भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, आज पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, त्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

17 दिवसांचं उपोषण अखेर स्थगित; आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये आज पावसाचा जोर वाढू शकतो. काही ठिकाणी मुसळधार सरींसह विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे. त्यामुळे नदी-नाले आणि सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

चारित्र्याच्या संशयातून गर्भवती प्रेयसीची हत्या; शीतपेयातून डांबरगोळ्या दिल्या

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंगोली, लातूर आणि नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज IMDने व्यक्त केला आहे.

‘भारतात एकही मुस्लीम नको’ असे हिंदूला वाटत असेल तर तो हिंदू नाही; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, राज्याच्या अन्य भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढग आणि उन्हाचा लपंडाव पाहायला मिळेल, तर तुरळक भागांत हलक्या सरी बरसू शकतात. त्यामुळे आज राज्यभर पावसाची तीव्रता एकसारखी नसून, विभागानुसार हवामानात बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

follow us