चारित्र्याच्या संशयातून गर्भवती प्रेयसीची हत्या; शीतपेयातून डांबरगोळ्या दिल्या
Chembur Pregnant Woman Killed प्रेयसीला प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या दिल्या. अचानक प्रकृती बिघडल्याने हा प्रकार समोर आला.
Pregnant Woman Killed by Lover in Chembur Over Character Doubt: मुंबईतील चेंबूरमध्ये प्रेमसंबंधातून एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रेयसीला प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या (tar balls) दिल्याचा आरोप आहे. हे पेय प्यायल्यानंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करताना आरसीएफ पोलिसांनी आशिष मगर या प्रियकराला अटक केली आहे.
वादानंतर दिले शीतपेय; प्यायल्यानंतर प्रकृती अचानक बिघडली
25 ऑगस्ट रोजी संबंधित महिला प्रियकर आशिष मगरसोबत असताना दोघांमध्ये वाद झाला होता. काही वेळाने वाद शांत झाल्यानंतर आशिषने तिला शीतपेय दिले. त्यामध्ये काही घातक पदार्थ असल्याची कल्पना नसल्याने महिलेने ते प्यायले. मात्र, त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती बिघडू लागली आणि तिला उलट्या होऊ लागल्या.
August 30 Horoscope :कोणाला लाभ, कोणाला सावधगिरी? जाणून घ्या तुमचे राशींचे भविष्य
सुरुवातीला कुटुंबीयांनी हा त्रास गांभीर्याने घेतला नाही. मात्र, तिची प्रकृती अधिकच खालावली आणि चक्कर येऊन ती खाली पडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. आधी खासगी रुग्णालयात उपचारासाठी प्रयत्न केल्यानंतर तिला शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
महिलेने मृत्यूपूर्वी सांगितली महत्त्वाची बाब
शीतपेय प्यायल्यानंतरच आपली प्रकृती बिघडल्याचे महिलेने कुटुंबीयांना सांगितले होते. तसेच हे शीतपेय आशिषने दिल्याचेही तिने नमूद केल्याची माहिती आहे. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी आशिषची चौकशी सुरू केल्यानंतर सुरुवातीला त्याने घटनेबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, पोलिसांच्या चौकशीत त्याने हत्येची कबुली दिल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाची हायकोर्टाकडून दखल; सरकारला विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश
दरम्यान, महिलेचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आशिष मगरला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलेच्या मृत्यूमागील संपूर्ण घटनाक्रम आणि हत्येचा नेमका उद्देश याचा आरसीएफ पोलीस तपास करत आहेत. चेंबूरमधील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.