मराठवाड्यात दुष्काळाचे सावट; धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव, विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याने धरणांतील पाण्याचा वापर इतर कारणांसाठी करण्याबाबतही काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 07T181440.897

अल् निनोचा वाढता प्रभाव आणि पावसातील (Marathwada) अनिश्चितता पाहता मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे राहिलेले नाही. त्यातच अल् निनोचा प्रभाव वाढल्याने पावसावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी धरणांमधील पाणीसाठ्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन आतापासूनच उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

शेतकरी कर्जमाफीनंतर विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरणार; एमपीएसीच्या ऑनलाईन परीक्षेविरूद्ध रोहित पवार आक्रमक

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याने धरणांतील पाण्याचा वापर इतर कारणांसाठी करण्याबाबतही काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत. विशेषतः रब्बी हंगामातील पिकांसाठी धरणांमधून पाणी सोडण्याचे नियोजन करताना उपलब्ध साठा आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज यांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही आगामी काळ महत्त्वाचा ठरणार आहे.

मराठवाड्यातील पाणी परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. उपलब्ध साठा, पावसाची स्थिती आणि आगामी हवामानाचा अंदाज यांचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाणार आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक तीव्र होऊ नये, यासाठी धरणांतील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.

follow us