“मी 2019 ला मविआचा प्रस्ताव पुढे केला” पृथ्वीराज चव्हाणांचा दावा; “आता पुलाखालून पाणी गेलंय” म्हणत दरेकरांचा पलटवार

Pravin Darekar On Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांच्या 2014 मध्ये मविआ सरकार स्थापनेच्या प्रस्तावाच्या दाव्यावर प्रविण दरेकरांनी टीका केली.

Pravin Darekar On Prithviraj Chavan

Pravin Darekar On Prithviraj Chavan Over 2014 MVA Claim : माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आणखी एक गौफ्यस्फोट केला आहे. मविआ म्हणून सत्ता स्थापन करु असा प्रस्ताव आम्हाला 2014 रोजी आला होता. मात्र तेव्हा मी हा प्रस्ताव फोटाळला आणि पुढे 2019 रोजी मीच हा प्रस्ताव पुढे केला, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर चव्हाणांच्या या दाव्यावर भाजप आमदार प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) प्रतिक्रिया दिली.

तुम्ही लोकांना घातक खाद्यपदार्थ घाऊ घालून त्रास दिला; आता भोगा; एफडीएविरोधात कोर्टात गेलेल्या हॉटेलचालकाला फटकारले

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी असा प्रस्ताव मला 2014 मध्येच मित्रपक्षाकडून आला होता. 2014 ला आमचा पराभव झाला आणि भाजपचं सरकार आलं. तेव्हा मित्रपक्ष म्हणाले, आपण यांना घालवू. पण मी तिथल्या तिथेच तो प्रस्ताव रिजेक्ट केला. कारण त्यावेळेला आमच्या पक्षाला शिवसेनेत जाणं मान्य नव्हतं, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला.

साखरेनंतर गूळालाही लागले महागाईचे मुंगळे; सणासुदीआधीच सामान्यांच्या खिशाला कातर

त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा मार्केटमध्ये आलेले आहेत. कारण ते दोन-चार दिवस झाले वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. यातून काँग्रेसमधील अंतर्गत लढाई दिसून येते. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य केली आहे की, भाजप खुप शक्तिशाली होत असून आता आपल्याला शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण शिवसेनेला सोबत घेऊन त्यांनी मिळवलं काय? दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसचीच वाट लावली अन् शिवसेनेचीही वाट लावली, असे प्रविण दरेकर म्हणाले.

माझे काम ट्रॉफी जिंकणे, ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवणे नाही; गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला

उलट शिवसेनाला सोबत घेऊन आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला पुढे नेले आणि त्यातून एकनाथ शिंदेंसारखं नेतृत्व पुढं आलं. मग एकनाथ शिंदेंना आणि अजित दादांना घेऊन भाजप पुढे गेली. त्यावेळी तुमचे डावपेच झाले पण तुमच्यापेक्षाही डावपेच करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं नेतृत्व आमच्याकडे आहे. तसेच आमची महायुती अधिक घट्ट असून पुढच्या 20 ते 25 वर्षापर्यंत आमच्यात फुट पाडण्यासाठी कुठेलेही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत, असे दरेकर म्हणाले.

कुणालने आयफोनसाठी जीवन संपवलं?; “मी पप्पांना सोडून देते” म्हणत आईची विनवणी, तरीही कुणाल थांबला नाही

पृथ्वीराज चव्हाणांच्या 2019 मध्ये युतीचा प्रस्ताव पुढे केल्याच्या दाव्यालाही दरेकरांनी उत्तर दिले. आता पुलाखालून पाणी गेलं, देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षात महाराष्ट्रात जो विकास केला. तसेच देवेंद्र फडणवीस जर सत्तेत राहिले तर ते काँग्रेसचं अस्तित्व ठेवतील की नाही याची भिती त्यांना आहे. म्हणून हे तीन पक्ष एकत्र आलेत. दगडापेक्षा वीट मऊ म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंशी युती केली आणि आता तीच वीट त्यांच्या पक्षासहीत कशी पाण्यात विरघळली हे महाराष्ट्राने पाहिलं. अशी टीका प्रविण दरेकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.

बाजारमूल्यात 30 हजार कोटींची घट, लक्ष्य मूल्यही कमी; बीएसईच्या शेअरबाबत तज्ज्ञांची सावध भूमिका

follow us