माझे काम ट्रॉफी जिंकणे, ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवणे नाही; गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला
Gautam Gambhir : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी करत असल्याची
Gautam Gambhir : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. तसेच माजी क्रिकेटपटू देखील गौतम गंभीरवर आरोप करताना दिसत आहे. तर आता गौतम गंभीरने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी करत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये बदल होत असल्याने अलीकडील अपयशाकडे गंभीर संकट म्हणून पाहू नये असं गौतम गंभीर म्हणाला. ट्रॉफी जिंकणे हेच माझे काम आहे. मला केवळ त्याचीच पर्वा आहे आणि त्यावरच माझा विश्वास आहे. ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवणे हे माझे काम नाही. इंग्लंड दौऱ्यापासून आम्ही समाधानकारक कसोटी क्रिकेट खेळलो आहोत. मानांकनांना काहीही महत्त्व नाही. असं देखील गौतम गंभीर म्हणाला.
गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय संघाचे (Team India) सूत्रे हाती घेतल्यापासून कसोटी संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन आश्विन सारख्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. ज्यामुळे भारतीय संघात सध्या कसोटी क्रिकेटमध्ये बदल होताना दिसत आहे. गौतम गंभीरच्या कार्यकाळात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील मालिकेत भारतीय संघाला पराभवचा सामना करावा लागला आहे.
तर आता भारतीय संघ बदलत असून देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) तिसऱ्या क्रमांकावर शानदार कामगिरी करत आहे. तर शुभमन गिल (Shubman Gill) कर्णधार म्हणून आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीत संघाला नवीन ताकद देत आहे तर फिरकी गोलंदाजी विभागात मानव सुथार (Manav Suthar) हा एक आशादायक पर्याय म्हणून समोर आला आहे. क्रिकेटमध्ये चढ-उतार येतच असतात. आपण आपल्या खेळाडूंना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना पुरेसा वाव दिला पाहिजे. हे केवळ एक-दोन सामन्यांवर अवलंबून नसावे असं देखील गौतम गंभीर म्हणाला.
साखरेचे भाव कमी होणार, सरकार अॅक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
तर दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, आम्ही अशी सर्वोत्तम गोलंदाजी फळी मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करू जी आम्हाला 20 विकेट मिळवून देऊ शकेल. कुलदीप हा एक चांगला गोलंदाज आहे आणि काही निर्णय हे कर्णधाराच्या हातातही असतात. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात स्थान मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना गौतम गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चर्चांनुसार, दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनला संधी मिळण्याची शक्यता आहे.