‘पुणे बंद’च्या हाकेवर महापौर मंजुषा नागपुरेंचा विद्यार्थ्यांना सल्ला; ‘राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहा’
MPSC विद्यार्थी आंदोलकांनी पुणे बंदची हाक दिल्यानंतर महापौर मंजुषा नागपुरेंनी विद्यार्थ्यांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहण्यास सांगितले.
Manjusha Nagpure Raises Questions Over MPSC Student Protest Pune: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता पुणे शहर बंदच्या आवाहनाची किनार मिळाली आहे. आंदोलनाच्या माध्यमातून पुणे शहर बंद पाडण्याची भूमिका काही आंदोलकांनी घेतल्यानंतर यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आंदोलकांच्या भूमिकेला आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे शहर विद्येचे माहेर आहे. लाखो मुलं शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येतात. पुण्यात शिकलेले विद्यार्थी 70 टक्के इथे स्थायित झाले आहेत, पुणेकर झाले आहेत. पुणे शहराने विद्यार्थ्यांना कायम मायेची उब दिलीय. आजपर्यंत विद्यार्थ्यांनी पण पुण्याला त्रास दिला नाही. मात्र रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शहर बंद पाडण्याचे विधान केलं आहे. रोहित पवार यांना आव्हान आहे की, त्यांनी पुणे बंद पाडून दाखवावे. कॉलेज चे विद्यार्थी पोहचू शकत नाहीत, रुग्ण रुग्णालयात पोहचू शकत नाही. पुणेकर काय आहेत हे आता त्यांना कळेल. विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. त्यांनी त्याचं करिअर घडवावं. ज्या पक्षाला राजकीय स्कोर घडवायचा आहे, त्यांच्या नादी लागू नये, अशी प्रतिक्रिया पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.
आज जे आंदोलन सुरू आहे, ते करणारे विद्यार्थी असावेत असं मला वाटत नाही. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यात राहतात. त्यांच्या दृष्टीने पुणे शहर बंद पाडणं योग्य आहे का?” असा सवालही महापौर मंजुषा नागपुरे यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांना भूमिका मांडण्याचा, मागणी करण्याचा अधिकार आहे. पुणेकरांना कुठला ही त्रास होऊ नये एवढाच मुद्दा आहे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय.
ठाकरेंच्या निर्णयाने शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ, उमेदवारीवरुन पुन्हा नाराजीचा सूर उमटला