अजित पवारांचा अपघात, रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप; हात जोडत सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Supriya Sule अजितदादांच्या अपघात प्रकरणी थेट फडणवीसांचे नाव घेत रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली
Supriya Sule on Rohit Pawar alligations on CM Fadanvis : अजितदादांच्या अपघातामागील वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनी आणि तिच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. आता या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून टीका टीपण्णी सुरू असताना आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांची पूर्ण पत्रकार परिषद मी बघितले नाही मी दिल्लीला गेले . आजच्या वर्तमानपत्रात मी बातमी वाचली. रोहितचा आणि दादाचं प्रेमाचं नातं होतं. त्यामुळे रोहित अस्वस्थ आहे की नेमकं काय झालं. देवेंद्र फडणवीस यांनी काल अमित शहांकडे जाहीरपणे मागणी केली की दादाचा एक्सीडेंट झाला त्याची पारदर्शक चौकशी करा आणि महाराष्ट्राला सांगा. सत्य बाहेर आलेच पाहिजे असे देवेंद्र फडणवीस काल म्हणाले.
पद्मश्री सुरेश तळवलकर यांना ‘मृद्गंध जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर
तसेच अमित शहा देखील त्यावर बोलले त्यांनी देखील याची दखल घेतली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर सांगितलं आहे. देशाच्या गृहमंत्र्यासमोर त्यांनी देखील मागणी केली आहे. त्यामुळे आपण रिपोर्टची वाट बघू. हा विषय केंद्र सरकारच्या अतिरिक्त येतो. त्याचं उत्तर पवार साहेब देतील. पवार साहेबांचे राजकारण गेले सहा दशक कधीच कोणावर आरोप प्रत्यारोप केले नाही. त्यांचं राजकारण वेगळे राहिलेला आहे.
दरम्यान जयपूर येथे पार पडलेल्या व्ही. के. सिंग यांच्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, याच संदर्भाचा हवाला देत मुख्यमंत्र्यांनीच व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अभय दिलचा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे. तसेच, माझ्या या आरोपात काही चूक असेल, तर सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे खुले आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले आहे. या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आ