‘गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज!’ गुलाबराव पाटलांची व्यासपीठावरून फटकेबाजी; जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरूनही टोला

Gulabrao Patil on Girish Mahajan: मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील मिश्किल टोलेबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

Gulabrao Patil on Girish Mahajan

Gulabrao Patil on Girish Mahajan: जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील मिश्किल टोलेबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. गिरीश महाजन यांच्या वयापासून ते त्यांच्या कार्यक्रमाला उशिरा येण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.

ब्लू इकोनॉमी कोकणाच्या सर्वांगीण विकासाचे इंजिन! मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून कोकणच्या सागरी संपत्तीला स्थानिक समृद्धीची जोड

‘गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज’

भाषणाच्या सुरुवातीलाच गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख ज्येष्ठ बंधू असा केला. मात्र, त्यानंतर त्यांच्या वयाचा उल्लेख करत त्यांनी कोपरखळी मारली. गिरीश महाजन यांचे वय 67 वर्षे असून आपले वय 60 वर्षे असल्याचे सांगत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली.

राजकारणात सर्वाधिक समाधान कोणत्या कामातून मिळत असेल, तर ते रुग्णसेवेतून मिळते, असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी, “त्रास देणाऱ्याला त्रास देणारे आम्ही आहोत,” असे म्हणत FDA च्या कारवाईवरूनही वक्तव्य केले. सुनील भंगाळे यांचा उल्लेख त्यांनी ‘रिअ‍ॅक्शन न देणारे इंजेक्शन’ असा केला.

‘फडणवीसांचं नाव घेणं म्हणजे संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल’; अजितदादांच्या मृत्यू प्रकरणावरून तांबेंचा रोहित पवारांवर निशाणा

आमच्याकडे अनेक प्रकारचे लोक येतात. घर नांदत नाही अशा महिलाही येतात. त्यामुळे आम्ही जनरल फिजिशियनसारखे काम करतो, असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. तसेच, 288 पैकी 265 आमदारांना बीपी आणि शुगर या दोन्हींचा त्रास असल्याचा दावाही त्यांनी केला. मला स्वतःलाही बीपी आणि शुगरचा त्रास आहे. तरीही दुपारी 12 वाजल्यापासून गिरीश महाजन यांच्यासाठी उपाशी आहे. त्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो आहे, असे म्हणत त्यांनी महाजनांना उशिरा येण्यावरून टोला लगावला. महाजन कार्यक्रमाला तब्बल एक तास उशिरा पोहोचले होते.

घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही टोलेबाजी

गुलाबराव पाटील यांनी यावेळी घराणेशाहीचा मुद्दाही मिश्किलपणे उपस्थित केला. “मंगेश चव्हाण आमदार, त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष; गिरीश महाजन मंत्री, त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष; प्रा. चंद्रकांत सोनवणे आमदार, त्यांच्या पत्नी माजी आमदार… आणि माझे काय?” असा सवाल त्यांनी केला. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करत त्यांनी राजकीय घराणेशाहीवरून टोलेबाजी केली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महाजनांना थेट आवाहन

गुलाबराव पाटील यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला तो जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा. “जिल्हा बँकेत उद्या भाजपचे दोन उमेदवार माघार घेतील,” असे वक्तव्य त्यांनी केले. गिरीश महाजन यांचा उल्लेख करताना, “गिरीश महाजन संकटमोचक आहेत; पण लय लफडेबाज माणूस आहेत,” असा टोला लगावला.

‘रोहित पवार म्हणजे डोक्यावर उलटा पडलेला अन् मढ्यावरच्या टाळूचं लोणी खाणारा माणूस’, राजेंद्र राऊतांची जहरी टीका

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासमोर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून गिरीश महाजन यांना सूचक आवाहन केले. त्यामुळे या निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

follow us