वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताला दोन धक्के; प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर संघाबाहेर

Washington Sundar : आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन सुंदरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Washinton Sundar

Washington Sundar : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) मालिकेदरम्यान भारतीय (India) संघात दोन महत्त्वाचे बदल झालेत. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे तिसऱ्या वनडेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अंशुल कंबोज याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला आगामी टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी नमन धीर याची निवड करण्यात आली आहे.


‘त्याने माझ्यावर अनेक वेळा वार केले’; रक्तबंबाळ अवस्थेतही स्मित मछार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सतर्क, हल्ल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम वनडेत खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने त्याच्या जागी अंशुल कंबोजची निवड केली आहे. कंबोज चंदीगड येथे भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलीय. त्यामुळे तिसरा सामना केवळ औपचारिकता असणार आहे.

एमपीएससी आंदोलनाच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण, पत्रकारांचा आंदोलनावर बहिष्कार


वॉशिंग्टन सुंदर टी-20 मालिकेतून बाहेर

आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन सुंदरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी नमन धीर याची टी-20 संघात निवड करण्यात आली आहे. नमन धीरने गेल्या आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.


वनडे टीम

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार/यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जयस्वाल, नमन धीर, अंशुल कंबोज.

टी-20 संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर.

follow us