भारत-वेस्ट इंडिज ODI आणि T20I मालिका 27 सप्टेंबरपासून; कुठे, कधी होणार सामने? जाणून घ्या
India vs West Indies Series भारत-वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाचे ODI आणि T20I संघ जाहीर. 27 सप्टेंबरपासून सामन्याला सुरुवात होणार.
India Announce ODI and T20I Squads for West Indies Series: वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ सप्टेंबरच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये एकूण आठ सामने खेळवले जाणार आहेत. यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांचा समावेश आहे. मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार असून, दौऱ्याचा समारोप 17 ऑक्टोबरला बंगळुरूतील टी-20 सामन्याने होईल.
मोठी बातमी : एफडीएच्या पथकाकडून ट्रकचा सहा तास थरारक पाठलाग; 1 कोटींचा गुटखा पकडला
एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबरला ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर 30 सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये दुसरा, तर 3 ऑक्टोबरला न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर स्टेडियमवर तिसरा सामना खेळवला जाईल. तिन्ही सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील.
महिलांचे प्रतिनिधित्व कमी असेल तर न्याय कसा मिळणार? हर्षदा देशमुख-जाधवांचा सवाल
एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. पहिला टी-20 सामना 6 ऑक्टोबरला लखनौमध्ये होईल. त्यानंतर रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू येथे उर्वरित सामने खेळवले जातील. सर्व टी-20 सामने सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
6 ऑक्टोबर: पहिला टी-20 — एकाना स्टेडियम, लखनौ
9 ऑक्टोबर: दुसरा टी-20 — जेएससीए स्टेडियम, रांची
11 ऑक्टोबर: तिसरा टी-20 — होळकर स्टेडियम, इंदूर
14 ऑक्टोबर: चौथा टी-20 — राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद
17 ऑक्टोबर: पाचवा टी-20 — एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
भारताचे संघ जाहीर; वेस्ट इंडिजकडून प्रतीक्षा
या दौऱ्यासाठी बीसीसीआयने दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. मात्र, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही.
एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, के.एल. राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जैस्वाल आणि नमन धीर.
टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव आणि मयंक यादव.