भारत हॉकी विश्वचषकातून बाहेर ; 51 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच
Hockey World Cup 2026 : भारतीय पुरुष संघ हॉकी विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारतीय
Hockey World Cup 2026 : भारतीय पुरुष संघ हॉकी विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारतीय संघाला अर्जेंटिनावर विजय मिळवणे आवश्यक होते मात्र या सामन्यात अर्जेंटिनाने 5-3 अशा भारतीय संघाचा पराभव केल्याने भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यात पराभव झाल्याने 51 वर्षांनंतर हॉकी विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्णच राहिले आहे.
वॅग्नर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली आहे. अर्जेंटिनाने सुरुवातीलाच आक्रमक खेळ सुरु करत अवघ्या 40 सेकंदातच आघाडी घेतली होती. त्यानंतर सातव्या मिनिटाला निकोलस डेलाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर दुसरीकडे 10 व्या मिनिटाला सुखजीत सिंगने शानदार करत भारताला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय संघ याचा फायदा घेऊ शकला नाही.
दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक खेळ केला. भारत आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला, तरीही कोणालाही प्रतिस्पर्ध्याची बचावफळी भेदता आली नाही. या सत्रात एकही गोल झाला नाही. 33 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या टोमास डोमेनेने गोल केला. त्यानंतर, 45 व्या मिनिटाला त्यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करत अर्जेंटिनाने 4-1 ने आघाडी घेतली. तर 53 व्या मिनिटाला टोस्कानीने पुन्हा एक गोल करत अर्जेंटिनाने 5-1 अशी आघाडी घेतली. तर दुसरीकडे सुखजीत सिंगने 58 व्या मिनिटाला आणि त्यानंतर 59 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने भारताकडून गोल केले. या सामन्यात अर्जेंटिनाने भारतीय संघाचा 5-3 असा पराभव केला आणि त्यांना विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला.
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार-
भारतीय संघाचे स्वप्न भंगले
अर्जेंटिनाकडून झालेल्या पराभवानंतर, विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. भारतीय संघाने गेल्या 51 वर्षांत हॉकी विश्वचषक जिंकलेला नाही. भारतीय संघाने शेवटचे विजेतेपद 1975 मध्ये जिंकले होते. तेव्हा क्वालालंपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला होता.