राजू शेट्टींचा अहिल्यानगरमध्ये एल्गार! ऊसदर जाहीर होईपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Sugarcane Farmers Protest in Ahmednagar : ऊसदर जाहीर होईपर्यंत अहिल्यानगरमधील साखर कारखाने बंद ठेवण्याचे आदेश.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 23T200651.785

Sugarcane Farmers Protest in Ahmednagar : अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदरवाढीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने अखेर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ऊसदर जाहीर होईपर्यंत जिल्ह्यातील साखर कारखाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, साखर आयुक्त गणेश पुरी आणि खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. या चर्चेनंतर कारखान्यांचे दर निश्चित होईपर्यंत गाळप सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या 26 तारखेला साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. या निर्णयामुळे ऊसदर आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे.

दरम्यान, 26 तारखेच्या बैठकीत शेतकरी संघटनांच्या मागण्यांनुसार सकारात्मक निर्णय न झाल्यास 28 तारखेला जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि रेल्वे मार्ग रोखण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. तोपर्यंत पुढील दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उद्या सकाळपासून साखर कारखान्यांकडे जाणारी वाहतूक अडवण्यात येणार असल्याचेही संघटनांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी बैठकीत ऊसदराचा तिढा सुटणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

follow us