ADCC Bank : मी जिल्हा सहकारी बॅंकेचा चौकीदार…सुजय विखे अध्यक्ष होताच निलेश लंकेंची टोलेबाजी!

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे यांची निवड होताच खासदार निलेश लंके यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलीयं.

Nilesh Lanke

ADCC Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या (ADCC Bank) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड आज पार पडली. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांची जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून रणजित देशमुख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. विखे यांच्या निवडीनंतर विखे समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केलायं. तर दुसरीकडे परिवर्तन पॅनलमधून विजयी झालेले खासदार निलेश लंके यांनी या निवडीवर प्रतिक्रिया दिलीयं. मी एकटाच विरोधी बाकावर असल्याने मी जिल्हा बॅंकेचा चौकीदार असून पुढील पाच वर्ष चौकीदारी करणे हीच माझी भूमिका राहणार असल्याचं निलेश लंकेंनी स्पष्ट केलंय.

माजी उपराष्ट्रपतींची प्रकृती अचानक बिघडली, मॉर्निंग वॉकदरम्यान बेशुद्ध होऊन पडले; एम्समध्ये उपचार सुरू

पुढे बोलताना खासदार लंके म्हणाले, जिल्हा बॅंकेत मी एकटा विरोधी बाकावर असल्याने निवड प्रक्रियेत माझा कुठलाही सहभाग नव्हता. कारखानदारी ही शेतकऱ्यांमुळे आहे, शेतकरी जगला तरच कारखाना जगेल, त्यामुळे प्रथम प्राधान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा कमी व्याजरात मिळालं पाहिजे. एकटाच विरोधी बाकावर असल्याने चौकीदाराची भूमिका माझ्याकडे आहे, पाच वर्ष चौकीदारी करणे ही माझी भूमिका असणार आहे, मी चौकीदाराची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं खासदार लंकेंनी स्पष्ट केलंय.

तसेच जिल्हा बॅंकेच्या संचालपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदा उपस्थित राहिलो. काही कारणास्तव उशिर झाला पण मी आलो रजिस्टरला सही केलीयं. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी कोणाचा पाठिंबा आहे की नाही, हे पाहण्यापेक्षा संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणे हे गरजेचं आहे. जनता विश्वासाने तुम्हाला पाठवत असतात
कोणी कोणाला पाठिंबा दिला माहिती नाही त्यावर चर्चा करणं योग्य नाही. निवडणुकीत बहुमताचा भाग असतो अधिकारानुसार अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक झाली असल्याचं निलेश लंकेंनी स्पष्ट केलंय.

जिल्हा बॅंकेकडून अनेक कारखान्यांनी कर्ज घेतले असून त्याची परतफेड अद्याप झाली नसल्याचा सवाल माध्यमांकडून निलेश लंके यांनी विचारण्यात आला. त्यावर निलेश लंके म्हणाले, जिल्हा बॅंकेने आरबीआयच्या नियमाप्रमाणे कर्जवाटप केलं पाहिजे, त्याच नियमाप्रामाणेच कर्जाची वसुली केली पाहिजेत, आता राजकीय भांडण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचं लंके यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीत अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात विखे-थोरात सहकार पॅनलचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे. विशेष म्हणजे, राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे विखे आणि थोरात सहकाराच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

follow us