ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा टॉस जिंकला; सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात प्रथम फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल.

  • Written By: Published:
News Photo (48)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. (Ind vs Aus) या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज (23 ऑक्टोबर)दुसरा एकदिवसीय सामना होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात प्रथम फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले, तर भारताने कोणताही बदल केला नाही. ऑस्ट्रेलियाने फिलिपच्या जागी अ‍ॅलेक्स कॅरीला तर एलिसच्या जागी झेवियर बार्टलेटला संघात स्थान दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतला मिळाली मोठी जबाबदारी

दुसऱ्या सामन्यासाठी भारताची
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर

दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, मॅट रेशॉन, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा, जोश हेझलवूड.

भारताचा संपूर्ण संघ-
रोहित शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन),विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव , वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, धृव जुरेल.

ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ-
मिशेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, मिशेल ओन, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जेवियर बार्टलेट, मॅट रेनशॉ, एडम झम्पा, बेनड्वारशुइस

follow us