शशिकांत शिंदें लेखावर आमचा आक्षेप, पुढं असं केलं तर.., तटकरेंचा शिंदेंना थेट इशारा
सुनिल तटकरे यांनी विलीणीकरणाचा मुद्दा निकाली काढला आहे. सध्यातरी त्यावर मी बोलणार नीाही असंही ते म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार यावर खोसकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा करू. परंतु, शशिकांत शिंदे यांच्या लेखावर आमचा आक्षेप आहे. त्यातील बाबी सत्य आहेत का? याबद्दलही आम्हाला शंका आहेत असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या विषयावर राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी विलीणीकरणाचा मुद्दा निकाली काढला आहे. सध्यातरी त्यावर मी बोलणार नीाही असंही ते म्हणाले. ते पत्रकार परिषद होलत होते.
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडं देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. त्यामुळं आपली जबाबदारी आहे की, दादांचं स्वप्न पूर्ण करायचं. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणं, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भारत सरकारने अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करून देशासमोर ही भूमिका मांडावी ह्या संदर्भातील मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तसंच, अपघाताच्या संशयाबाबत पुरावे द्या, असंही सुनील तटकरे म्हणाले. युरोपीयन कंपनीकडं तपास दिला होता का? कुणी फोन केला? ते मला माहिती नाही. त्यांनी कुणाचा फोन गेला, काय गेला, तपास यंत्रणांमध्ये कोण नेमत असतं त्याची माहिती ते जाणकर असल्याने त्यांच्याकडं अधिक माहिती असेल, असं म्हणत सुनील तटकरेंनी रोहित पवारांना टोलाही लगावला.
रोहित पवार यांनी माझं नाव कुठं घेतलं ते सांगा?. तर मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ ही 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती. ती भेट पावणे सात वाजता संपली. ती भेट तीन दिवस आधी ठरली होती. कारण दोन दिवस अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर होते, मी रायगडच्या दौऱ्यावर होतो, असं स्पष्टीकरणही सुनील तटकरेंनी दिलं.
