Manoj Jarange Patil : ‘वर्षा’ वर आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा 

Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्रावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्रावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोलापूरच्या तांदुळवाडीत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचं नाही. एखाद्यावेळेस मराठे मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे असं सूत्र म्हणत आहेत. सूत्रांच्या माध्यमातून तशी बातमी आलेली आहे. बघू काय होतंय पुढे असं जरांगे पाटील म्हणाले. तसेच मुंबईला जाऊन बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत. काही अडचण नाही. शेअर मार्केटचा बैल बघायचा आहे. विमानतळावर जाऊन विमान कसं उडतं ते बघायचं आहे. मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान कसं आहे ते बघायचं राहिलं आहे. मला तर असं वाटतंय वर्षावर बसलेलंच उपोषणाला बरं राहिल. तिथे फडणवीस यांनी पाण्याची टाकी ठेवली आहे. त्यात पाणी कमी पडली तर मी भरतो. उपोषणाला पाण्याच्या टाकीवर बसतो असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

बावनकुळेंसोबत फडणवीसही जातीयवाद करत आहेत

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जीवाची बाजी लावून झुंज दिली पण बावनकुळेंनी आमच्या तोंडातला घास हिसकावण्याचं काम केलं. आपण त्यांना चूक सुधारायला सांगितलं. तुम्ही मराठे चांगले आहात.तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. मला समाजावर अभिमान आहे. समाज माझ्यासाठी प्रिय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चूक झाली मान्य करतील अशी आमची अपेक्षा होती. मराठ्यांनीच यांना सत्तेत बसवलं पण हे मराठ्यांना विसरले आहेत. बावनकुळेंसोबत फडणवीसही जातीयवाद करत आहेत असा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे.

नांदेड गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला

आता उठाव करावा लागणार

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उठाव करावा लागेल असं म्हटलं आहे. ज्याने चूक केली त्याची मुख्यमंत्री पाठराखण करत आहेत. त्यामुळे मराठ्यांना त्रास देणाऱ्यांचा माज उतरावा लागेल. धनगरांचं त्यांनी वाटोळं केलं. शेतकऱ्यांची फजिती केली. याची सत्ता आणण्यासाठी आपण किती दिवस प्रयत्न करणार आहे? आता उठाव करावा लागणार आहे असं देखील यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us