नांदेड गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला

Sukhbir Singh Badal : नांदेड गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना घडली

Sukhbir Singh Badal

Sukhbir Singh Badal : नांदेड गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेत एक सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.

नांदेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका निहंग शीख व्यक्तीने नांदेडमधील गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर हल्ला केला. हाताला दुखापत झाल्यानंतर बादल यांना रुग्णालयात नेण्यात आले. सुखबीर सिंग बादल पत्नी हरसिमरत बादल (Harsimrat Badal) आणि कुटुंबासह प्रार्थना करण्यासाठी नांदेड येथील ‘तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा’ (Takht Sachkhand Sri Hazur Sahib Gurudwara) येथे गेले होते. या भेटीदरम्यान, एका निहंग शीख व्यक्तीने त्यांच्यावर ‘कृपाण’ ने (धार्मिक तलवार) हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा बादल यांनी प्रयत्न केला, परंतु कृपाणच्या वारामुळे त्यांच्या हातावर जखम झाली.

 सुखबीर बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ला

सुखबीर सिंग बादल यांच्यावर यापूर्वी देखील जीवघेणा हल्ला करण्यात आले आहे. 4 डिसेंबर 2024 रोजी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात  त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या जीवघेण्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला घटनास्थळीच पकडले होते. सुवर्ण मंदिरातील तो हल्ला ते प्रार्थना करत असताना झाला होता.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने गळफास घेऊन संपवलं जीवन

एका बंदूकधाऱ्याने त्यांच्यावर गोळी झाडली, परंतु सुदैवाने ती गोळी त्यांना न लागता भिंतीवर आदळली. त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हल्लेखोराला ताब्यात घेतले.

follow us