VIDEO : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील धक्कादायक घटना
Firing On Sukhbir Singh Badal In Golden Temple Premises : पंजाबचे (Panjab) माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मात्र ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. ही घटना ( Firing On Sukhbir Singh Badal) अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या (Golden Temple) बाहेर घडली, तिथे सुखबीर बादल रक्षक म्हणून काम करत होते. बादल धार्मिक शिक्षा भोगत असून आज त्यांच्या शिक्षेचा दुसरा दिवस आहे.
#WATCH | Punjab: Bullets fired at Golden Temple premises in Amritsar where SAD leaders, including party chief Sukhbir Singh Badal, are offering ‘seva’ under the religious punishments pronounced for them by Sri Akal Takht Sahib, on 2nd December.
Details awaited. pic.twitter.com/CFQaoiqLkx
— ANI (@ANI) December 4, 2024
सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर एका व्यक्तीने अचानक गोळीबार केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. ही घटना घडली तेव्हा तेथे अनेक लोक उपस्थित होते. गोळीबाराची ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. नारायण सिंह चौडा असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तो खालसा दलाचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येतंय.
भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के; तेलंगाणात भूकंपाचे केंद्र
सुखबीरवर हल्ला करण्यासाठी त्याने पॅन्टमधून पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. या झटापटीत गोळी अकाली दलाच्या नेत्याला लागली. आरोपी खलिस्तानी समर्थक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शीख धर्मगुरूंनी धार्मिक शिक्षा दिल्यानंतर एक दिवस अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी काल सुवर्ण मंदिराबाहेर ‘सेवादार’ म्हणून काम केलंय. शिक्षा भोगत असताना एका हातात भाला धरून बादल हे व्हीलचेअरवर सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून ते व्हीलचेअरचा वापर करत आहे. यानंतर त्यांनी तासभर कीर्तन ऐकलं आणि शेवटी टाकलेली भांडी घासली.
भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के; तेलंगाणात भूकंपाचे केंद्र
अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. हल्लेखोराची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याशिवाय माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया आणि सुखदेव सिंह धिंडसा यांनीही घाण घासली. तर पक्षाचे नेते डॉ. दलजितसिंग चीमा, सुरजितसिंग राखरा, प्रेमसिंग चंदूमाजरा, महेश इंदर ग्रेवाल यांनी स्वच्छतागृहाची स्वच्छता केली. सुखबीर सिंग बादल यांनाही शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा देण्यात आली होती, परंतु त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना त्यातून सूट देण्यात आली होती.