Golden Temple : चेहऱ्यावर तिरंगा म्हणून मुलीला रोखले, सुवर्णमंदिरात पुन्हा वाद

  • Written By: Published:
Golden Temple : चेहऱ्यावर तिरंगा म्हणून मुलीला रोखले, सुवर्णमंदिरात पुन्हा वाद

पंजाबमधील अमृतसर येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एका महिला भक्तासोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो.

धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या गालावर तिरंगा काढण्यात आला असल्यामुळे एका कर्मचाऱ्याने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तर त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

PM Modi यांची मिमिक्री करणाऱ्या आर्टिस्टच्या अडचणी आणखी वाढल्या…

गुरुद्वारा समितीने माफी मागितली

याबाबत गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सरचिटणीस गुरचरण सिंग ग्रेवाल म्हणाले की, “लोक ट्विट करून शीख समाजाला टार्गेट करत आहेत, हे दुर्दैवी आहे. देश-विदेशातून येथे येणाऱ्या सर्व भाविकांचा आम्ही आदर करतो. देशाच्या स्वातंत्र्यात शिखांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र प्रत्येक वेळी फक्त शीख समाजालाच लक्ष्य केले जातं आहे.”

ग्रेवाल म्हणाले, “सुवर्ण मंदिर हे शीख समाजाचे धार्मिक स्थळ आहेत. प्रत्येक धार्मिक स्थळाची स्वतःची प्रतिष्ठा असते. आम्ही सर्वांचे स्वागत करतो. पण कोणत्याही अधिकाऱ्याने गैरवर्तन केले असल्यास आम्ही दिलगीर व्यक्त करतो. पण त्या मुलीच्या चेहऱ्यावरील ध्वज आपला राष्ट्रध्वज नव्हता कारण त्यात अशोकचक्र नव्हते. तो राजकीय झेंड्यासारखा दिसत होता.”

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

सुवर्ण मंदिरात सर्व धर्माचे लोक येतात

सुवर्ण मंदिर हे शीख धर्माचे आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. हरमंदिर साहिबमध्ये सर्व स्तरातील आणि धर्मातील लोकांना पूजेसाठी येण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. या तलावाभोवती चार प्रवेशद्वारांसह परिक्रमा मार्ग आहे. संकुलातील गर्भगृह आणि तलावाभोवती अनेक इमारती बांधल्या आहेत. त्यापैकी एक अकाल तख्त आहे, जे शीख धर्माच्या धार्मिक अधिकाराचे मुख्य केंद्र आहे.

सुवर्ण मंदिरात शीख समुदायाद्वारे चालवल्या जाणार्‍या खुल्या स्वयंपाकघरात कोणताही भेदभाव न करता सर्व भाविकांना साधे शाकाहारी भोजन दिले जाते. दररोज 1,00,000 हून अधिक लोक पूजेसाठी सुवर्ण मंदिरात येतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube